कोवीड वॉरियर्स  सत्कारमुर्तीसोबत कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, सोबत महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक, इंन्स्टिट्युट मिनेझीस ब्रागांझाचे माजी अध्यक्ष संजय हरमलकर, तसेच महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा पल्लवी दाभोलकर आणी संचालक मंडळाचे सदस्य  संतोष गोवेकर
गोवा

Goa: रविंद्र भवन इमारतीचा पाया विधानसभा निवडणुकीपूर्वीच

याबाबतीत सत्तर टक्के जमीनीसकट इतर सोपस्कार पुर्ण झाले असल्याची माहिती यावेळी मंत्री गावडे यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

शिवोली: बार्देशकरांची अनेक वर्षापासून मागणी असलेल्या रविंद्र भवन इमारतीचा (Ravindra Bhavan building) पाया पेडणे आणी बार्देशातील आमदार- मंत्र्यांचे सहकार्य लाभल्यास येत्या विधानसभा निवडणुकीपुर्वीच (Even before the assembly elections) घातला जाणार असल्याची स्पष्ट ग्वाही राज्याचे कला व सांस्कृतिक तसेच सहकार मंत्री गोवींद गावडे यांनी शिवोलीत दिली. दरम्यान, याबाबतीत सत्तर टक्के जमीनीसकट इतर  सोपस्कार पुर्ण झाले असल्याची माहिती  यावेळी मंत्री गावडे यांनी दिली.

दरम्यान, शिवोली येथील दि वुमन्स सहकारी बहुउद्देशीय सोसायटीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलतांना मंत्री गावडे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मिनेझिस ब्रागांझा ईन्स्टिट्यूटचे  माजी अध्यक्ष संजय हरमलकर, महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालीका दिपाली नाईक, ग्लोबल इ वेस्टचे संचालक कायतानो फर्नाडीस, शिवम प्रभू , आंसगांवचे सरपंच हनुमंत नाईक,ओशेलच्या वंदना नार्वेकर, सडयेचे निलेश वायंगणकर, मार्ना- शिवोलीच्या शर्मीला वेर्णेकर, स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर सोसायटीच्या अध्यक्षा पल्लवी दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसतांना संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी दाभोलकर यांनी संघटन कौशल्याच्या जोरावर धाडसी निर्णय घेत शिवोलीत दि वुमन सहकारी पतसंस्थेची स्थापना करून यशस्वीपणे सहाव्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल सहकार मंत्री गावडे यांनी संचालक मंडळ तसेच भागधारकांचे कौतुक केले. जबर इच्छा शक्ती आणी संयम- धैर्य बाळगण्याची क्षमता असलेल्या महिलांनी समाजकारणांबरोबरच राजकारणातही उतरण्याचे त्यांनी महिलांना आवाहन केले.

यावेळी कोवीड महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या शिवोली आरोग्य केंद्राच्या डॉ. श्रुती नार्वेकर, परिचारिका उज्वला साळकर, अरुणा दाभोलकर, रमाबाई सांळगांवकर, कलाकार रामेश्वर सांळगांवकर, शिवा ताम्हणकर, आंसगांवचे सरपंच हनुमंत नाईक, ओशेलचे पंचसदस्य प्रवीण कोचरेकर, पत्रकार जयेश नाईक, प्रितेश गारुडी, संतोष गोवेकर, निवुत्ती शिरोडकर, विनोद मेथर तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विठोबा बगळी, सामाजिक कार्यकर्ते बालाजी कान्नाईक, प्रदीप दाभोलकर, महेश वायंगणकर, प्रेमानंद आरोलकर, तसेच राधाकृष्ण वायंगणकर, यांचा शाल श्रीफळ तसेच स्मृती चिन्ह देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. सोसायटीचे संचालक मंडळ आणी भागधारकांना मंत्री गावडे यांच्याहस्ते विशेष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. संजय हरमलकर, दिपाली नाईक तसेच निलेश वेर्णेकर यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी इ -वेस्ट प्रक्रिये संबंधात कायतानो फर्नाडीस तसेच शिवम प्रभू यांनी सविस्तर माहिती दिली. अहवाल वाचन समिक्षा कोचरेकर यांनी तर स्वागत पतसंस्थेच्या अध्यक्षा पल्लवी दाभोलकर यांनी केले. शेवटी स्मितल केळुस्कर यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT