Goa: जसे राष्ट्रीय महामार्ग ६६ (National Highway 66) वर हजारो खड्डे आहेत त्याच प्रमाणे पेडणे मतदार संघातील पोरस्कडे ते सतीया देवी पुला पर्यंत जीव घेणे शेकडो खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग (Road Department) अपयशी ठरले आहे. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी या रस्त्यावर विजेची सोय नसल्याने अनेक लहान मोठे अपघात (Accidents) घडत असतात; या रस्त्याची चाळण झाली आहे.
या भागाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या नागरिक आणि वाहनचालकाना डोकेदुखी ठरत आहे . दरदिवशी या रस्त्यावर अपघात होतो , नागरिक जखमी होतात , आणि प्रशाशन मात्र आजही सुस्त आहे . मनुष्य बळीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग आतुरलेला आहे , रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जी आवश्यक जमीन आहे ती जमीन अजूनपर्यंत संपादित केली नाही , सरकारच बेकायदा रस्ता करीत असल्याचा दावा करत २६ रोजी मंत्री दीपक पावसकर व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना नागरिकांनी जाब विचारला
तक्रार स्थानिकावर नोंद
आपल्या डोळ्यादेखत या रस्त्यावरील खड्ड्यात पडून नागरिक जखमी होतात , काहीजण मरण पावतात , अश्यावेळी जखमीच्या मदतीला स्थानिक धावून जातात , या रस्त्याच्या कामाविषयी ठेकेदाराला जाब विचारला तर ठेकेदार पोलीस स्टेशनवर जावून स्थानिक नागरिकांच्या विरोधात तक्रार नोंदवतात , आणि पेडणे पोलीस शहानिशा न करताच गुन्हा नोंदवून त्याला पकडण्यासाठी राजकीय दबाव असल्यामुळे धावपळ करतात , ज्याने लोकहितासाठी ठेकेदाराला जाब विचारला तर गुन्हा आणि आज पर्यंत या रस्त्यावर डझनभर मनुष्य मेले त्याच्या विरोधात गुन्हा नाही
माजी सरपंच सीताराम परब यांनी प्रतिक्रिया देताना या रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने त्या ठेकेदार कारणीभूत आहे . खड्यात पडून अपघात होतात आणि मनुष्य हानी होती , आता पोलिसांनी ठेकेदारावर आणि रस्त्या अभियात्यावर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे असे ते म्हणाले .
रस्त्यासाठी लोक रस्त्यावर
कामधंदा व्यवसाय सोडून लोकांना रस्त्यावर उतरण्याची हौस नाही मात्र संवेदनशील नागरिक गप्प कसे बसणार , आपल्या डोळ्यादेखत अपघात होताना आणि रस्ता मृत्यूचा सापळा बनताना नागरिक गप्प राहू शकत नाही सरकारचे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन वेळोवेळी केले जाते , सरकारला वेळोवेळी निवेदने देवून काम व्यवस्थित करण्याची मागणी केली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.