मडगाव: कोंकणी साहित्यीक, अऩुवादक, कोशकार मुकेश थळी यांचा सम्राट क्लब चोडण याना अचिवर्स पुरस्कार घोषित झाला आहे. रविवारी 26 सप्टेंबर रोजी चोडणच्या पंचायत सभागृहात आयोजित खास कार्यक्रमात चतुरस्र व बहुआयामी अष्टपैलू लेखक थळी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात य़ेईल असे क्लबाचे धर्मा चोडणकर यानी सांगितलं. थळी हे चोडण गांवचे सुपुत्र व त्यांनी कला साहित्याच्या क्षेत्रात जे राष्ट्रीय स्तरावरील योगदान दिलं आहे. त्यांचा अभिमान वाटतो म्हणून त्यांचा हा गौरव एकमताने करण्याचे ठरविले आहे असे चोडणकार यानी सांगितले.
मुकेश थळी आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक आहेत. कोंकणी, मराठी, इंग्रजी भाषेत ते सातत्याने स्तंभलेखन करतात. वळेसर, हंसध्वनी, अक्षरब्रह्म, जीवनगंध, रंगतरंग हे त्यांचे निबंदसंग्रह प्रकाशित आहेत. दोरेमीफा, सारेनीसा या प्रकाशित पुस्तकाला कला अकादमी कोंकणी नाट्य स्पर्धेत लेखनाचे प्रथम बक्षिस मिळालं होते. ते कोंकणी – इंग्रजी शब्दकोशाचे सहरचनाकार असून गोवा विद्यापीठाच्या कोंकणी विश्वकोश विभागांत संशोधन सहाय्यक म्हणून त्यानी पाच वर्षे सेवा दिली आहे.
50 कोंकणी कथांचे त्यानी इंग्रजीत अनुवाद केले आहेत. त्यानी कथा, कविता, एकांकिका, गीते आनी नाटकांचे लेखन केले आहे.सूत्रसंचालक आणि मुलाखतकार म्हणून त्यांची खास ओळख आहे. साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात थळी याना कित्येक पुरस्कार मिळाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.