Goa weather update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: अंगाची लाही-लाही! वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण; तापमानाची पस्तीशीपार

Goa Temperature: शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पट्ट्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम राज्यात ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात दिसून येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालला असून असह्य उष्म्यामुळे घामाच्या धारा लागत आहेत आणि अंगाची लाही-लाही होत आहे. ऐन मार्च महिन्यात मे सदृश स्थिती निर्माण झाल्याने वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

राज्यात कमाल ३५.४ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली, जी यंदाच्या मार्चमधील सर्वाधिक तापमान आहे. पुढील दोन दिवस तापमान ३५ अंशांवर राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

ढगाळ हवामान

शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पट्ट्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम राज्यात ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात दिसून येत आहे. दिवसभर कडक ऊन आणि ढगाळ वातावरण यामुळे नागरिकांना अधिक त्रास होत आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

कमाल तापमानात ३.१ अंशांनी वाढ

सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत ४.५ अंशांनी वाढ झाली तर उष्माघात मानला जातो. मात्र, आज राज्यात कमाल तापमानात ३.१ अंश सेल्सिअसने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर किमान तापमानातही २.२ अंशांनी वाढ झाली आहे. आज कमाल ८९ टक्के इतकी आर्द्रता नोंदविण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तापमानात झालेली वाढ लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना उष्म्याचा त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT