Goa Temperature: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढला; येत्या दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता

Goa weather update: राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
 Goa weather update
Goa weather updateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Temperature Rise : राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असल्याने रस्ते आणि बाजारपेठांमध्ये वर्दळ कमी होताना दिसत आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेय आणि सावलीचा आधार घेताना दिसत आहेत.

राज्यात कमाल ३३.४ अंश सेल्सिअस तर किमान २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच आर्द्रतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून ते तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 Goa weather update
Goa Weather: गोव्यात निसर्गाचा 'डबल गेम'! दुपारी अंगाची लाहीलाही तर रात्री हुडहुडी; पाहा हवामान खात्याचा नवा इशारा

गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसांत तापमान आणखी वाढून ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असले तरी उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवतील, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

 Goa weather update
पाकड्यांचा गेम होणार? पल्लेकेलेत पावसाचे काळे ढग; 'वरुणराजा' पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या Weather Report

सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत ४.५ अंशांनी तापमान वाढल्यास त्या स्थितीला उष्माघाताची परिस्थिती मानली जाते. सध्या राज्यातील तापमान सरासरीपेक्षा सुमारे २.३ अंशांनी जास्त नोंदवले गेले आहे. त्यामुळे लहान मुले, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com