Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोमंतकीयांनो काळजी घ्या! राज्यात उन्हाचा कडाका वाढला; तापमान 37.4 अंशांवर

Goa Temperature Rise: मंगळवारी (25 फेब्रुवारी) पणजी येथे कमाल ३७.४ अंश सेल्सिअस तर किमान २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Temperature Rise Heatwave 37 Degrees

पणजी: गोव्यात मागील आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमामात वाढ झाली आहे. सातत्याने कमाल तापमानात वाढ होत असून मंगळवारी राज्यात ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. जी सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ४.९ अंश सेल्सिअसने अधिक झाल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

पुढील दोन दिवस राज्यात उष्म्याच्या झळा अधिक वाढतील, तसेच आर्द्रतेतही वाढ होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. विशेषतः सकाळी ११ नंतर दुपारी ४ वा.पर्यंत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवेल. ऋतुमान बदलामुळे सातत्याने काही प्रमाणात तापमान वाढ होत राहील. सर्वसामान्यपणे कमाल किंवा किमान तापमानात (Temperature) एक ते दोन अंशांनी वाढ किंवा घट सामान्य मानली जाते, परंतु ४ .९ इतकी वाढ तीही फेब्रुवारी महिन्यात होणे म्हणजे सूर्य आग ओकण्याचा प्रकार म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

मंगळवारी (25 फेब्रुवारी) पणजी येथे कमाल ३७.४ अंश सेल्सिअस तर किमान २१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील तीन दिवस उत्तर-पश्‍चिम भारतात उष्म्याचा प्रभाव वाढणार आहे. सामान्य तापमानाच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी तापमान वाढणार असून कोकण आणि गोवा (Goa), उत्तर केरळ आणि किनारी कर्नाटकात उष्म्याच्या २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कायम राहणार असल्याचे भारतीय वेधशाळेने म्हटले आहे तसेच या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

घाटाखाली ठंडा ठंडा कूल कूल ...

राज्यात जरी मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असला तरी देखील राज्यातील काही भागात खासकरून घाटलगतच्या भागात कालपासून काही प्रमाणात थंडी पडत आहे, पहाटे देखील थंडी जाणवत आहे मात्र दुपारी १२ नंतर उष्म्याने नागरिक (Citizens) हैराण होत आहेत. त्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी आणि दुपारी घामाच्या धारा लागणारा उष्मा दुहेरी हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.

अशी घ्या काळजी!

नागरिकांनी उष्म्यापासून आपला बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे जरुरीचे आहे. दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे तसेच योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन गोवा वेधशाळेने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

SCROLL FOR NEXT