Mental Health Awareness Dainik Gomantak
गोवा

Mental Health Awareness: गोव्यात युवा आणि नोकरदारांवर मानसिक तणावाचा वाढता भार; टेली मानसचा लाभ घेणाऱ्यांपैकी 73 टक्के 18 ते 45 वयोगटातील

Tele Mental Health Counselling: सेवेअंतर्गत मानसिक स्वास्थ्य सल्ला घेणाऱ्यांमध्ये याच प्रकारच्या लोकांची संख्या सर्वांत जास्त दिसून येते.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: करिअर बनवण्याची धडपड आणि नंतर नोकरीतील टास्क पूर्ण करण्याचे दडपण यांमुळे राज्यातील युवा आणि नोकरदार वर्ग विलक्षण तणावाखाली वावरत असून या तणावापासून सुटका करून घेण्यासाठी टेली मानस या मानसिक आधार संस्थेची त्यांना मदत होऊ लागली आहे.

या सेवेअंतर्गत मानसिक स्वास्थ्य सल्ला घेणाऱ्यांमध्ये याच प्रकारच्या लोकांची संख्या सर्वांत जास्त दिसून येते. मानसिक तणावातून मार्ग काढण्यासाठी आता टेली मानस सेवेचा आधार घेण्याचे प्रमाण राज्यात बऱ्यापैकी वाढले असून आतापर्यंत ४०,६९२ लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती या सेवेच्या दक्षिण गोवाप्रमुख डॉ. स्नेहा पोकळे यांनी दिली.

या यंत्रणेकडून जी आकडेवारी प्राप्त झाली, त्यानुसार अशा मानसिक आधार सल्ल्यासाठी सर्वाधिक फोन १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे असून एकूण व्यक्तींच्या तुलनेत हे प्रमाण ७३.५० टक्के एवढे प्रचंड आहे. इतर वयोगटांमध्ये ० ते १२ वयोगट २.४ टक्के, १३ ते १७ वयोगट १०.४ टक्के, ४६ ते ६४ वयोगट ११ टक्के तर ६५ वर्षांवरील वयोगटातील २.७ टक्के व्यक्तींचा समावेश आहे.

गोव्यातील जीवनशैलीही मानसिक तणावासाठी मुख्य कारण ठरत असून उदासीन मनस्थितीत असलेले जास्त लोक दिसून आले आहेत. या सेवेअंतर्गत आधार मागणाऱ्यांमध्ये उदासीन मनस्थितीत असलेल्यांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण २९.६२ टक्के एवढे प्रचंड आहे. त्यापाठोपाठ मनात आत्महत्येचा विचार येणारे (३ टक्के) आहेत. नकारात्मक विचार येणाऱ्यांचे प्रमाण १.९१ टक्के, शोकाकुल अवस्थेतील ०.८० टक्के तर अपघात झाल्यावर तणावाखाली येणाऱ्यांची संख्या ०.२० टक्के एवढी आहे.

कशी आहे टेली मानस सेवा?

टेली मानस ही गोवा सरकारतर्फे लोकांना मानसिक आधार देण्यासाठी २४ × ७ या तत्त्वावर चालणारी टेलिफोनवरून सल्ला देणारी यंत्रणा असून या सेवेची सुरवात मे २०२३ पासून सुरू झाली. या सेवेअंतर्गत लोकांना मानसिक ताणापासून दूर कसे स्वतःला ठेवावे, याचा सल्ला तज्ज्ञांमार्फत दिला जातो. गरज पडल्यास पुढे समुपदेशन आणि उपचार या सेवाही दिल्या जातात. ही सेवा घेण्यासाठी १४४१६ किंवा १८००-८९१-४४१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणे शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Fast Patrol Vessel: गोवा शिपयार्डची मोठी कामगिरी! भारतीय तटरक्षक दलाच्या 'अजित' गस्ती जहाजाचे राष्ट्रार्पण

Rohit Sharma Fan: रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकणार तेव्हाच दाढी करणार अन् केस कापणार! हिटमॅनच्या चाहत्याचा हटके संकल्प चर्चेत

National Green Tribunal Stay: मुरगाव बंदराच्या खोलीकरणाला ब्रेक! पर्यावरणीय अभ्यासावर प्रश्न उपस्थित करत हरित लवादाचा आदेश

Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

Abhijeet Dipke Detained: विमानात घुसून दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, अभिजीत दीपकेसह CJP नेते ताब्यात; विमानतळावर हाय-व्होल्टेज ड्रामा VIDEO

SCROLL FOR NEXT