Goa AAP: महिलांना दरमहा 3 हजार, कुटुंबांना 10 लाखांचा आरोग्य विमा... 'आप'कडून गोमंतकीयांसाठी सहा मोठ्या घोषणा

AAP Six Guarantees Goa: भाजप सरकारच्या काळात गोव्याची दुर्दशा झाली असून, जनता महागाई, बेरोजगारी, वीज बिलांचा वाढता भार, पाणीटंचाई आणि भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे.
AAP Six Guarantees Goa
Goa AAPDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भाजप सरकारच्या काळात गोव्याची दुर्दशा झाली असून, जनता महागाई, बेरोजगारी, वीज बिलांचा वाढता भार, पाणीटंचाई आणि भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोमंतकीयांसाठी सहा योजनांची घोषणा केली.

पणजी येथील मराठा समाज सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ‘आप’च्या प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार व्हेन्झी व्हिएगस, प्रशांत नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले की, ‘आप’ची सत्ता असलेल्या राज्यांत मोफत वीज दिली जाते; मात्र गोव्यात सामान्य नागरिकांना अवाढव्य वीज बिले भरावी लागत आहेत.

AAP Six Guarantees Goa
Goa Municipal Elections: गोव्यात नगरपालिका निवडणुका फेब्रुवारी 2027 मध्ये? उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे राजकीय घडामोडींना वेग

‘गृहआधार’ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात, असा दावा करत त्यांनी प्रत्येक महिलेला दरमहा आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी आणि बेरोजगारी वाढवल्याचा आरोप केला. आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी गोव्याचे भाजपपासून रक्षण करण्यासाठी ‘आप’ची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

अशा आहेत सहा योजना

प्रत्येक गोमंतकीयाला २४ तास वीज आणि ३०० युनिट वीज मोफत.

प्रत्येक महिलेला दरमहा ३ हजार रुपये.

प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचा आरोग्य विमा.

‘कलम ३९-ए’ एका महिन्यात रद्द करण्याचे आश्वासन.

सर्व महिलांना मोफत बस प्रवास.

प्रत्येक गावात क्रीडा मैदानाची उभारणी.

AAP Six Guarantees Goa
Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com