

पणजी: कळंगुट येथील पर्यटन खात्याच्या सशुल्क वाहनतळावर पर्यटकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारल्याची पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जादा शुल्क आकारणीस जबाबदार असलेल्या संबंधिताला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन खात्याच्या अखत्यारितील सशुल्क वाहनतळांच्या कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. कळंगुटमधील प्रकाराची पर्यटन संचालकांकडून तपासणी सुरू असून आवश्यक कारवाई केली जात आहे. खात्याने निश्चित केलेले दरच कंत्राटदारांना आकारता येतील. त्यापेक्षा अधिक शुल्क आकारण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.
वाहनतळांवरील अधिकृत दर नागरिकांना आणि पर्यटकांना सहज दिसतील अशा ठिकाणी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. तसेच शुल्क भरल्यानंतर प्रत्येक वाहनचालकाला अधिकृत पावती देणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. सशुल्क वाहनतळांच्या कामकाजाचे नियमित निरीक्षण केले जाते. संबंधितांकडून दर महिन्याला अहवाल मागवून शुल्क आकारणी आणि नियमपालनाची तपासणी होते. अनियमितता आढळल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते, असे खंवटे यांनी नमूद केले.
दरफलक आणि पावती बंधनकारक
सशुल्क वाहनतळांवर अधिकृत पार्किंग दर ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. शुल्क भरल्यानंतर प्रत्येक वाहनचालकाला अधिकृत पावती देणेही बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.
कामकाजाचा दरमहा आढावा
पर्यटन खात्याकडून सशुल्क वाहनतळांच्या कामकाजाचे नियमित निरीक्षण केले जाते. यासाठी संबंधितांकडून दरमहा अहवाल मागवले जातात. शुल्क आकारणी, कामकाज आणि नियमांचे पालन यांत त्रुटी आढळल्यास चौकशी करून कारवाई केली जाते, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.