IND vs NZ 1st Test: वेलिंग्टनमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांचा जलवा! न्यूझीलंडविरुद्ध 12 वर्षांनंतर रचला मोठा रेकॉर्ड; शानदार कामगिरीने वेधले लक्ष

Indian Fast Bowlers Take All 10 Wickets Wellington After 12 Years: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वेलिंग्टनच्या मैदानावर भारतीय वेगवान गोलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली.
Indian Fast Bowlers Take All 10 Wickets Wellington After 12 Years
Indian Fast Bowlers Take All 10 Wickets Wellington After 12 YearsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Indian Fast Bowlers Take All 10 Wickets Wellington After 12 Years: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वेलिंग्टनच्या मैदानावर भारतीय वेगवान गोलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी ठरवत वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव 368 धावांवर गुंडाळला. विशेष म्हणजे या डावातील सर्वच्या सर्व दहा बळी भारतीय वेगवान गोलंदाजांनीच टिपले असून, तब्बल बारा वर्षांनंतर असा पराक्रम घडला.

यापूर्वी, 2014 मध्ये वेलिंग्टनमध्येच भारतीय वेगवान गोलंदाजांनी ही किमया साधली होती, तेव्हा इशांत शर्माने सहा आणि मोहम्मद शमीने चार बळी घेतले होते, तर रवींद्र जडेजाने केवळ दोन षटके टाकली होती. सुरुवातीला न्यूझीलंडची 70 धावांत पाच बाद अशी बिकट अवस्था झाली होती; मात्र त्यानंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी सहाव्या विकेट्ससाठी 216 धावांची दमदार भागीदारी करत संघाला सावरले.

Indian Fast Bowlers Take All 10 Wickets Wellington After 12 Years
IND vs NZ Test: हक्काची विकेट हुकल्याने गिल नाराज! फिलिप्सच्या एलबीडब्ल्यूवर हायव्होल्टेज ड्रामा; खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल

फिलिप्सने 216 चेंडूंत 118 धावांची खेळी खेळली, तर निकोल्सने शेवटपर्यंत एकाकी झुंज देत नाबाद 175 धावांची दमदार खेळी खेळली. दुसऱ्या दिवशी पाच बाद 243 धावांवरुन पुढे खेळताना न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी फारसा निभाव लागू दिला नाही.

Indian Fast Bowlers Take All 10 Wickets Wellington After 12 Years
IND vs NZ Test: भेदक गोलंदाजी आणि नवा रेकॉर्ड! जसप्रीत बुमराहने रचला इतिहास; भारताच्या टॉप-10 कसोटी गोलंदाजांच्या लिस्टमध्ये एंट्री

भारतीय गोलंदाजीचा कणा ठरलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर आकाशदीपने तीन, अंशुल कंबोजने दोन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक गडी बाद केला. दुसऱ्या सत्रात प्रसिद्धने नॅथन स्मिथला (14), आकाशदीपने काइल जेमिसनला (11) आणि बुमराहने मॅट हेन्रीला (1) बाद केले. अखेरीस अंशुल कंबोजने जेकब डफीचा बळी घेत न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सांगता केली. एकंदरीत वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर भारतीय वेगवान गोलंदाजांचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.