Goa Teachers : आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन Dainik Gomantak
गोवा

अन्‍यथा आंदोलक शिक्षकांची दिवाळीही आझाद मैदानावरच

सरकारने प्रसंगी कायद्यात बदल करावा

दैनिक गोमन्तक

पणजी : सरकार आमच्या मागण्या मान्य करण्यास असमर्थ ठरत असेल तर आम्ही दिवाळीही (Diwali) आझाद मैदानावरच साजरी करू. पण आंदोलनापासून (Teachers Agitation) मागे हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा रविवारी कंत्राटी शारीरिक शिक्षकांनी (Goa Teachers) दिला. आंदोलनाचा कालचा पाचवा दिवस होता. दरम्यान, आणखी तीन शिक्षकांची प्रकृती खालावली. त्‍यामुळे त्‍यांना इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. काल शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मागील आश्‍वासनाचीच ढोलकी वाजविल्याने शिक्षकांमध्‍ये नाराजी आहे. नोकरीत कायम करा या मागणीसाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. असे असताना सरकार आमची क्रूर चेष्टा करीत असल्याचा आरोप यावेळी शिक्षक गंगाराम लांबोर यांनी केला. ते म्हणाले, सरकार जर आमच्या आंदोलनाची दखल घेणार नसेल तर आम्ही देखील येथून हलणार नाही.

दिवाळीही आझाद मैदानावरच साजरी करू. सरकारने प्रसंगी कायद्यात बदल करावा. आम्ही बारा वर्षांपासून कार्यरत आहोत. दहा वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार आहे.

सरकारमधील एकही प्रतिनिधी आतापर्यंत आम्‍हाला भेटायला आलेला नाही. आम्हीही मतदार आहोत. या लोकप्रतिनिधींना आमचीही गरज आहे. ते आमच्या दरवाजापर्यंत येतील तेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत सुनावावे लागेल. सध्या तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, अशी तिखट प्रतिक्रीया शिक्षकांनी व्‍यक्त केली.

महिलांची अवस्‍था बिकट

आंदोलनादरम्यान आज रविवारी पुन्हा तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. महिला आंदोलकांची खूपच बिकट अवस्‍था असल्‍याची माहिती आंदोलक दीपक गावकर यांनी दिली. रात्री ९ नंतर स्वच्छतागृह बंद असते. रात्री मद्यपी गटागटाने मैदानात येऊन दारू पिऊन गोंधळ घालतात. त्यामुळे आंदोलकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे त्‍यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT