Goa Taxi Drivers Daimik Gomantak
गोवा

Goa Taxi Meter: ॲपबेस मीटर बिघडले! टॅक्सीधारकांची वाहतूक संचालनालयात धाव; दंडाच्या भीतीने टॅक्सीचालक ‘पॅनिक’

Goa Taxi Meter News: प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सींसाठी सरकारच्यावतीने बसविलेल्या ॲपबेस मीटर बिघाड आल्याने टॅक्सी धारकांनी वाहतूक संचालनालयात धाव घेतली.

Sameer Panditrao

पणजी: प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सींसाठी सरकारच्यावतीने बसविलेल्या ॲपबेस मीटर बिघाड आल्याने टॅक्सी धारकांनी वाहतूक संचालनालयात धाव घेतली. ॲपबेस मीटरमधील पॅनिक (PANIC) बटनच ऑपरेट होत नाही व ट्रॅकिंग डिव्हाईस चालू नसल्याने टॅक्सी चालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे वाहतूक खात्याकडून पॅनिक बटन चालू नाही, ट्रॅकिंग डिव्हाईस चालू नसल्याने आरटीओ दंड आकारत असल्याने टॅक्सी चालक त्रस्त झाले आहेत.

टॅक्सीचालकांना येत असलेल्या अडचणींमुळे आज सायंकाळी टॅक्सी चालकांनी वाहतूक संचालनालयात धाव घेतली. परंतु तेथेही अधिकाऱ्यांना त्याविषयी माहिती नाही. दरम्यान, याविषयी टॅक्सी चालक संघटनेचे सदस्य योगेश गोवेकर यांनी सांगितले की, आम्हाला आरटीओ पोलिस आम्हाला दंडाची पावती देतात, ती पावती म्हणजे पॅनिक बटन बंद राहिल्याने आणि ट्रॅकिंग डिव्हाईस बंद असल्याचे कारण देऊन दंड आकारला जात आहे, ही सरकारकडून निव्वळ फसवणूक आहे.

पॅनिक बटन चालत नसल्याने व ट्रॅकिंग डिव्हाईस बंद असल्याने ज्या कंपन्यांनी मीटर बसविला आहे, त्यांच्याकडे संपर्क साधला. त्यात संबंधित टॅक्सी चालकांना ४ हजार ६५० रुपये जे मीटर मेंटनन्ससाठी रुपये घेतात. आरटीओ विभाग ११ हजारांचा डिव्हाईस घातला जातो, पण पॅनिक बटन चालत नाही हे त्यांना दाखविण्यात आले.

आम्ही कशाला दंड भरावा, असा सवाल त्यांनी केला. ४ हजार ६५० मीटर मेन्टनन्ससाठी घेतात, तर दोन सीमकार्ड रिचार्ज आणि लाईव्ह लोकेशन ॲप दुरुस्त का होत नाही, असा सवाल त्यांनी संबंधितांना केला. तर याविषयी सरकारला तुम्ही विचारा म्हणून ते उत्तर दिले जाते. याविषयी कोणतीही पायाभूत सुविधा नाही, नियंत्रण कक्ष नाही तर सरकारची ही कसली सेवा आहे, हेच काही कळत नाही. दरम्यान, सरकारने टॅक्सीचालकांची ही चालवलेली मिरवणूक बंद करावी, तुमच्या चुकीमुळे ‘आरटीओ’ आम्हाला दंड आकारत असल्याचे त्यांनी सांगितले.

दंडाच्या भीतीने टॅक्सीचालक ‘पॅनिक’

सरकारच्यावतीने टॅक्सींना बसविलेल्या मीटरमध्ये केवळ ‘पॅनिक’ हा संदेश दिसत होता. मात्र, एका टॅक्सीचालकाला हा संदेश येऊनही दंड आकारल्याने इतर चालकांनाही आता दंड भरावा लागणार असल्याची भीती वाटू लागली. आपण जानेवारी महिन्यात नवी कार घेतली आणि तीला ॲपबेस मीटर बसविला. परंतु आम्हाला एका टॅक्सी चालकाला दंड आकारल्याचे दिसून आल्याने आम्ही वाहतूक संचालनालयाकडे आलो आहेत, असे एका चालकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT