Taxi Meter X
गोवा

Goa Taxi App: वाहतूक क्षेत्रात मोठा बदल! ‘गोवा टॅक्सी अ‍ॅप’मध्ये 1000 चालक; 70 हजारहून अधिक प्रवास पूर्ण

Goa Tourism: राज्य सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम, पारदर्शक आणि सुलभ वाहतूक सेवा निर्माण करत गोव्याच्या पर्यटनस्नेही प्रतिमेला बळकटी देत आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडवत ‘गोवा टॅक्सी अ‍ॅप’ने आत्तापर्यंत ७० हजारहून अधिक प्रवास पूर्ण केले. एक हजारहून अधिक टॅक्सीचालकांना या डिजिटल प्लॅटफॉर्मखाली एकत्र आणण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम, पारदर्शक आणि सुलभ वाहतूक सेवा निर्माण करत गोव्याच्या पर्यटनस्नेही प्रतिमेला बळकटी देत आहे.

पर्यटन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अ‍ॅप प्रवाशांना सहज बुकींग, रिअल टाइम ट्रॅकिंग, एसओएस सुविधा आणि सरकार-निश्चित भाडे दर यांसह सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करतो. या सेवेला प्रवाशांसोबतच चालकवर्गाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसार मिळणाऱ्या योग्य मोबदल्यामुळे चालकांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

या टॅक्सी सेवा प्रथम ५ जानेवारी २०२३ रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू झाली होती. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२३ रोजी मडगाव रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्यात आला आणि अधिकृत मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून ही सेवा राज्यभर उपलब्ध झाली.

Goa Taxi Driver Assaulted

‘गोवा टॅक्सी अ‍ॅप’द्वारे प्रवाशांना रोख, कार्ड, युपीआय आणि वॉलेटद्वारे पेमेंटचे विविध पर्याय उपलब्ध असून गुगल मॅपच्या मदतीने लोकेशन ट्रॅकिंग करता येते. तसेच चालकांच्या रेटिंगवर आधारित अधिक ट्रिप संधी व चांगल्या वर्तनास प्रोत्साहनही यात देण्यात आले आहे.

गोव्यातील वाढत्या पर्यटनासोबत, हा अ‍ॅप एक भविष्यकालीन वाहतूक पर्याय म्हणून उभा राहत असून प्रवाशांसाठी प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित, सोयीचा आणि किफायतशीर बनवत आहे. सरकारच्या या धोरणात्मक प्रयत्नामुळे टॅक्सी सेवा अधिक औपचारिक आणि नियंत्रित होत असून गोव्याच्या एकंदर पर्यटन अनुभवात दर्जात्मक वाढ होत आहे.

‘टॅक्सीचालकांचे जीवनमान उंचावले’

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, हा अ‍ॅप केवळ तांत्रिक नवकल्पना नाही, तर गोव्यातील वाहतुकीला सुरक्षित, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे हजारो स्थानिक टॅक्सीचालकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT