Goa Taxi App: अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवेमुळे सुरक्षित प्रवास करता येणार! मंत्री गुदिन्होंचे मत; लोकांचे समर्थन असल्याचा दावा

Mauvin Godinho: मंत्री गुदिन्हो म्हणाले, अ‍ॅपमुळे टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता येईल. सरकारकडे प्रवाशांचा आणि टॅक्सी व्यवसायाचा संपूर्ण डेटा उपलब्ध होईल.
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Mauvin Godinho About App Based Taxi Service

पणजी: गोव्यात अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. या सेवेमुळे टॅक्सी प्रवास अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल, असे मत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.

काही टॅक्सी चालक या निर्णयाला विरोध करत असले, तरी बहुतांश चालक आणि नागरिक याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुदिन्हो म्हणाले, गोवा हे लहान राज्य आहे, त्यामुळे येथे अ‍ॅप आधारित सेवा लागू करायची गरज नाही, असे काही टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे. मात्र, सरकारने विविध गटांशी चर्चा केली असून, बहुतांश लोक अ‍ॅपसाठी तयार आहेत.

अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवासी आणि टॅक्सी चालक यांच्यात पारदर्शक व्यवहार होतील. अ‍ॅपद्वारे ठरलेली किंमत कायम राहणार असून त्यात कोणताही बदल होणार नाही. चालकांना हवे असेल, तर सरकार त्यांच्यासाठी खास अ‍ॅप तयार करायला देखील तयार आहे.

Mauvin Godinho
'CM येत नाहीत तोवर एक इंचही मागे हटणार नाही'; Goa Miles विरोधात टॅक्सी व्यावसायिक आक्रमक, पेडण्यात 'चक्का जाम'

गुदिन्हो पुढे म्हणाले, अ‍ॅपवर टॅक्सी सेवा आणली, तर ती एकाच दरात आणि पारदर्शक पद्धतीने चालेल. अ‍ॅपद्वारे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित राहील आणि सर्व व्यवहार नोंदले जातील. यामुळे टॅक्सी चालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत देखील होईल. अ‍ॅप प्रणालीमुळे टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता येईल आणि प्रवाशांना निश्चित दर माहीत राहील. सर्व व्यवहार अ‍ॅपवर ट्रॅक होणार असल्याने, सरकारलाही टॅक्सी व्यवसायाचे व्यवस्थित नियमन करता येईल. अ‍ॅपवर आधारित प्रणालीमुळे टॅक्सी चालकांचे उत्पन्न वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे.

Mauvin Godinho
Goa Taxi Meter: गोवा टॅक्सी सेवेबाबत महत्वाची बातमी! भाडे मीटर म्हणून 'ॲप'ला मान्यता; नियमांमध्ये सुधारणा

डेटा सुरक्षा आणि परवाने!

मंत्री गुदिन्हो म्हणाले, अ‍ॅपमुळे टॅक्सी व्यवसायात पारदर्शकता येईल. सरकारकडे प्रवाशांचा आणि टॅक्सी व्यवसायाचा संपूर्ण डेटा उपलब्ध होईल, ज्यामुळे नियोजन आणि सुरक्षितता वाढेल. यामुळे परवान्यांचे व्यवस्थापन सुलभ होईल. काही नेते आणि टॅक्सी चालक अ‍ॅप आधारित प्रणालीला विरोध करत आहेत, मात्र हा विरोध चुकीच्या माहितीवर आधारित आहे. अ‍ॅपमुळे फक्त पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढणार आहे, नुकसान काहीच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com