Traffic Violation Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Violations: गोवा पोलिसांचा 'नो हेल्मेट, नो लायसन्स' फंडा हिट! 6734 ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड; वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर मोठी कारवाई

Goa Driving License Suspension: राज्यात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर 2025 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 6734 हून अधिक वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आले. या निलंबनांमध्ये 'हेल्मेट न घालणे' हा नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, जी गोव्यातील रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी मोठी चिंताजनक बाब आहे. वाहतूक विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात गंभीर वाहतूक नियमांचे उल्लंघन सतत होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

हेल्मेट न घालणे हा मुख्य धोका

वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होण्यामागे हेल्मेट न घालणे हे मुख्य कारण आहे. एकूण निलंबनापैकी एक मोठा हिस्सा या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचा आहे. या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याच्या नियमांकडे अनेक नागरिक आणि पर्यटक गंभीरपणे दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते.

इतर प्रमुख गुन्हे

केवळ हेल्मेट न घालणे इतकेच नाही, तर इतर प्रमुख वाहतूक गुन्ह्यांमुळे देखील मोठ्या संख्येने लायसन्स निलंबित झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत मद्यपान करुन वाहन चालवल्यामुळे 534 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून 'ड्रंक अँड ड्राईव्ह' विरोधात मोहीम सुरु असूनही ही संख्या मोठी आहे. अतिवेगाने वाहन चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे हे देखील लायसन्स निलंबनाचे सततचे आणि गंभीर कारण ठरले आहे.

कारवाईचा उद्देश आणि आवाहन

वाहतूक विभागाने स्पष्ट केले की, ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा उद्देश केवळ दंड आकारणे हा नाही, तर रस्त्यांवरील सुरक्षा वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. हेल्मेट न घालणे, मद्यपान करुन गाडी चालवणे आणि अतिवेग ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत आणि अशा गुन्ह्यांना पायबंद घालणे गरजेचे आहे. या आकडेवारीनंतर गोव्याच्या (Goa) वाहतूक विभागाने वाहनचालकांना नियम पाळण्याचे आणि स्वतःच्या तसेच सहप्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले. ही कठोर कारवाई पुढेही सुरु राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

माणुसकीला काळिमा! गाईच्या पोटातून निघाला 48 किलो प्लास्टिकचा डोंगर; वाळपईत 'रेकॉर्ड ब्रेक' शस्त्रक्रिया

Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT