Traffic Violation: वाहनचालकांनो सावधान! मडगाव पोलिसांकडून 578 वाहनचालकांना तालांव, दोन महिन्यांत 5.93 लाखांचा दंड वसूल

Goa Police: दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणाऱ्यांवर मडगाव वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे.
Traffic Violation
Traffic ViolationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दुचाकी चालविताना हेल्मेट न घालणाऱ्यांवर  मडगाव वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून सुरू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत (जानेवारी ते फेब्रुवारी) दरम्यान पोलिसांनी एकूण ५७८ वाहनचालकांना तालांव देताना ५ लाख ९३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. 

हेल्मेटसंबंधी  पोलिसांकडून वारंवार जागृती केली जात  असली तरीही अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून विनाहेल्मेट दुचाकी चालवत असतात, यात तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी  दिली.

वाहतूक नियमाचा हा भंग आहे. दरम्यान, विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचे प्रकार शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात होताना दिसतात.

शहरी भागात वाहतूक पोलिस काटेकोरपणे कारवाई करतात. मात्र, ग्रामीण भागाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे एका नागरिकाने सांगितले. तसेच दुचाकीवर तीनजण बसून वाहतुकीचे प्रकारही ग्रामीण भागात वाढले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात कडक मोहीम

जानेवारी महिन्यात मडगाव  वाहतूक पोलिसांनी  विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ८४ जणांना पकडून ९०,५०० रुपये दंड वसूल केला. फेब्रुवारी महिन्यात ४९४ जणांना पकडले. त्यांच्याकडून ५,०३,०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com