Goa BJP | Giriraj Vernekar  Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Escape Case: राजकीय वातावरण तापलं! सुलेमानचा Video विरोधकांकडे कसा पोहोचला? पालेकरांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

Goa Politics: बेपत्ता सिद्दीकी याचा व्हिडिओ विरोधकांकडे कसा पोहोचला? तो पळून जातो आणि त्याचवेळी व्हिडिओ मिळालेले अमित पालेकर विदेशात जातात, याचा संबंध काय?

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बेपत्ता सिद्दीकी याचा व्हिडिओ विरोधकांकडे कसा पोहोचला? तो पळून जातो आणि त्याचवेळी व्हिडिओ मिळालेले अमित पालेकर विदेशात जातात, याचा संबंध काय? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सरकारला लक्ष्य करण्यासाठी या व्हिडिओची कल्पना कुणाची याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपने आज केली.

पणजी (Panaji) येथील पक्षाच्‍या कार्यालयात आमदार दाजी साळकर, प्रदेश सचिव सिद्धेश नाईक आणि प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. साळकर म्हणाले, सुलेमान हा देववाणी असलेली व्यक्ती असावी, अशा आविर्भावात विरोधकांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे आहेत. अशा व्यक्तीवर विश्वास तरी का ठेवावा?

भाजपचे काही प्रश्‍‍न

पळालेल्‍या सिद्दीकीला व्हिडिओ काढ, असे कोणी सांगितले? नेमका तो व्हिडिओ पालेकर यांच्याकडे पोहोचला कसा? त्याचवेळी ते विदेशात जाण्यास निघतात, हा निव्वळ योगायोग आहे का?

पालेकर यांनी विदेशात जात असल्याने व्हिडिओ आपचे आमदार किंवा प्रवक्त्याकडे न देता काँग्रेसच्या (Congress) कवठणकर यांच्याकडे का दिला? पालेकरांना आपल्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नाही?

व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीची विश्वासार्हता काय? आरोपांची चौकशी व्हावी; पण सिद्दीकी सापडला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT