Goa: At Tisk Ponda area has a permanent traffic jam. due to the work of the drainage project. on Tuesday, 20 July, 2021
Goa: At Tisk Ponda area has a permanent traffic jam. due to the work of the drainage project. on Tuesday, 20 July, 2021 Sandeep Suve Kamble / Dainik Gomantak
गोवा

Goa: भर पावसात फोंड्यात ‘एसटीपी’चे काम

Sandeep Survekamble

फोंडा ः बाहेर धोऽऽ धोऽऽऽ पाऊस कोसळतोय आणि भर रस्त्यावर मलनिस्सारण (एसटीपी) प्रकल्पाचे ((TCP Plant) काम चालतेय, कसलेच नियोजन न करता चाललेल्या या कामामुळे सध्या फोंडावासीयांना (Ponda-Goa) वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. दाग-फोंडा कपिलेश्‍वरी मार्गावर (On Kapileshwari Road) तर धोकादायक स्थिती असून तिस्क फोंडा ते कपिलेश्‍वरी रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. एसटीपी कंत्राटदाराच्या या मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून प्रशासन आहे की नाही, असा सवाल केला आहे. गेल्या २०१४ सालापासून एसटीपी (TCP Plant) प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामात कोणतेच सातत्य नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. विशेषतः भर रस्त्यावर भल्या मोठ्या विहिरी (Well) खोदल्या जात असून हे खड्डे (Road Patholes) खोदून काम झाल्यावर व्यवस्थित बुजवले जात नाहीत. वास्तविक रस्त्याचे खोदकाम हे पावसाळ्यात केल्यानंतर या कामाबद्दल (Work) विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. हे काम किती काळ टिकेल, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या चार वर्षांत तर या नियोजन नसलेल्या कामामुळे फोंड्यातील (Ponda-Goa) रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. सगळीकडे खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचून त्याचा त्रास विशेषतः दुचाकीस्वारांना होत आहे. सध्या तिस्क - फोंडा ते दाग कपिलेश्‍वरीपर्यंतच्या रस्त्यावर भल्या मोठ्या विहिरी रस्त्यावर खणल्या असून पावसाळ्यात केलेले हे काम कितपत टिकेल, अशी चर्चा होत आहे. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असून खराब रस्त्यांमुळे लोक या मार्गाने येण्याचे टाळत आहेत, सरकारी यंत्रणेचे कोणतेच नियोजन नसल्याने फोंडावासयांची ही थट्टा चालली आहे काय, असा संतप्त सवाल केला जात आहे.

सहा वर्षांपासून जास्त काळ सुरू असलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे फोंड्यातील रस्ते खड्ड्यात आहेत की खड्ड्यांत फोंड्याचा रस्ता गेला आहे, असा प्रकार चालला आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण होणे शक्य नाही. फक्त फोंडा - खडपाबांध रस्ता तेवढा हॉटमिक्स करण्यात आला आहे. इतर ठिकाणी ‘पॅचअप’ काम करण्यात आले आहे. फोंड्यातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणाची निविदा देण्यात आल्या असल्या तरी एसटीपी काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कंत्राटदारांना डांबरीकरण करायला मिळत नाही, अशी स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT