Siolim
SiolimDainik G

Goa: समुद्राच्या तटावर बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरुन शिवोलीत 'राजकारण'

संरक्षक भिंतीच्या बांधकामावरुन सध्या शिवोलीतील (Siolim) राजकारण बरेच तापले आहे.
Published on

शिवोली: हणजुण-कायसुव पंचायत क्षेत्रातील, बंदीरवाडा- शापोरा (Bandirwada- Shapora) येथील श्री साखळेश्वर देवस्थानच्या मंदिर (Sakhaleshwar Temple) परिसरात समुद्राच्या तोंडावर उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरुन सध्या शिवोलीतील (Siolim) राजकारण बरेच तापले आहे.

दरम्यान, या  प्रकरणांवरुन राज्यातील बंदर कप्तान खात्याशी संबंधित एका वरिष्ठ अधिकार्याची  तडकाफडकी बदली करण्यात आल्याचेही समजते. दरम्यान, साखळेश्वर देवस्थानच्या परिसरात संरक्षक भींत उभारण्याचे काम सहा महिने आधीच सुरू झाले होते.  स्थानिक आमदार विनोद पालयेंकर, तसेच हणजुण-कायसुवचे सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा आणी स्थानिक देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत येथील कामाचा विधीवत नारळ वाढवून याआधीच शुभारंभ झाला होता. 

Siolim
Goa HSC Results 2021: डिचोलीतील 'या' शाळेचा शंभर टक्के निकाल

दरम्यान, मंदिर परिसराच्या  तोंडावर असलेल्या अरबी समुद्राच्या जोरदार लाटांचा मारा बसून श्री साखळेश्वर देवस्थान इमारतीच्या भिंतीना दरवर्षी  तडे जात असल्याने या जागेत संरक्षक भिंत तसेच विसर्जनासाठी आणण्यात येणाऱ्या  गणेश मुर्त्या ठेवण्यासाठी सुबक आसन व्यवस्था निर्माण  करण्याचा  निर्णय संबंधित देवस्थान समितीच्या संमतीनेच  घेण्यात आला होता असे शिवोलीचे आमदार तथा माजी जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेंकर यांनी याबाबतीत विचारणा केली असतां सांगितले. 

Siolim
Goa : "संस्था सभासदांच्या कर्तृत्वाने मोठ्या होतात"

आपण आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात सदरच्या कामासाठी जलस्त्रोत खात्यामार्फत कायदेशीर मान्यता तसेच परवानगी घेवुंनच येथील  काम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  दरम्यान, येथील मंदिर परिसराला लागुनच असलेल्या श्रीगणेश विसर्जनाची जागा आणी तेथील  शंभर वर्षा हून अधिक जुनी पायवाट त्यांचप्रमाणे स्थानिक मच्छीमार बांधवांचा  मासेमारीसाठी समुद्रात  पनेळ आणी होड्या उतरविण्याच्या पारंपरिक रस्त्यात संरक्षक भिंतीच्या कामामुळे अतिक्रमण झाल्याचा ग्रांमस्थांचा आरोप असून  सदरचे काम तात्काळ रोखण्याची  मागणी ग्रांमस्थांनी केली आहे.

Siolim
Goa: अखेर बेकायदा दुकाने जमीनदोस्त

दरम्यान, यासंबंधात  बंदर कप्तान  खात्याचे मंत्री मायकल लोबो यांच्याशी थेट संम्पर्क साधून येथील काम तात्काळ बंद ठेवण्याची मागणी ग्रांमस्थांकडून करण्यात आली आहे. तथापि,   ग्रांमस्थांच्या तक्रारीवरुनच बंदर कप्तान खात्याशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ अधिकार्याची तात्काळ अन्य जागी बदली करण्यात आल्याने सध्या येथील प्रकरणाला स्थानिक आमदार विरोधात मंत्री मायकल लोबो असे राजकीय वळण लागल्याची  याभागात जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com