Investment Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सावधान! तोतया अधिकारी लुबाडतोय; ‘प्रदूषण’ मंडळाचे नाव सांगून लाखोंचा गंडा, पोलिस तक्रार करूनही कारवाई नाही

Goa Pollution Control Board fraud: राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्‍याचे भासवून काहीजण विविध भागांतील व्‍यावसायिकांना लुबाडत आहेत. व्‍यावसायिकांची सुमारे १.४० लाखांची फसवणूक झाल्‍याच्‍या तक्रारी.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्‍याचे भासवून काहीजण विविध भागांतील व्‍यावसायिकांना लुबाडत आहेत. आतापर्यंत अशाप्रकारे व्‍यावसायिकांची सुमारे १.४० लाखांची फसवणूक झाल्‍याच्‍या तक्रारी मंडळाकडे पोहोचल्‍या असून, याबाबत वारंवार स्‍थानिक पोलिस स्‍थानकांत तक्रारी दाखल करूनही यातील संशयितांव कारवाई होत नसल्‍याचे पत्र मंडळाने दोन्‍ही जिल्‍ह्यांच्‍या अधीक्षकांना पाठवले आहे.

मंडळाचे सदस्‍य सचिव संजीव जोगळेकर यांनी दोन्‍हीही अधीक्षकांना हे पत्र पाठवले आहे. आझोशी–मुरगाव येथील अँथनी रॉड्रिग्‍स यांनी २३ ऑक्‍टोबर २०२४ रोजी सुदेश गावस नामक व्‍यक्तीने आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्‍याचे सांगून आणि आस्‍थापनावर कारवाई करण्‍याची धमकी देऊन आपल्‍याकडून ऑनलाईन पद्धतीने २४,९०० रुपये घेतल्‍याची तक्रार केली होती.

त्‍याबाबत मंडळाने साळगाव पोलिस स्‍थानकात तक्रार दाखल केली होती. काणकोण येथील दीप काणकिया या महिलेने सुदेश गावस, सुदेश भोसले आणि सूरज पेंडसे १८ डिसेंबर २०२४ रोजी अशाच पद्धतीने आपली फसवणूक केल्‍याची तक्रार दाखल केली. त्‍यानंतर नाईकवाडा–कळंगुट येथील मारिया मुखतार शेख यांनीही ३० जानेवारी २०२५ रोजी सिद्धार्थ गावकर आणि सूरज यांनी आपल्‍याला २२,२०० रुपयांना लुटल्‍याची तक्रार केली.

याबाबत मंडळाने पर्वरी पोलिस स्‍थानकात दाखल केली होती. काहीच दिवसांपूर्वी केपे येथील दुर्गादेवी बार अँड रेस्‍टॉरन्‍टसंदर्भात धमकी देऊन सूरज पेंडसे नामक व्‍यक्तीने आपली ९३,४०० रुपयांची फसवणूक केल्‍याची तक्रार दाखल केली. या तक्रारींबाबत स्‍थानिक पोलिसांत मंडळाने वारंवार तकारी करूनही या प्रकरणी संशयितांचा शोध घेण्‍यात पोलिसांना यश आलेले नाही, असे मंडळाने अधीक्षकांना पाठवलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

इतरांचीही फसवणूक होण्‍याची शक्‍यता

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या नावाखाली या संशयितांकडून इतरही व्‍यावसायिकांची फसवणूक होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍यांचा तत्‍काळ शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कारवाई करावी, अशी मागणीही मंडळाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT