Plastic Pollution: गोव्याला प्लास्टिकचा विळखा, विल्हेवाटीच्या खर्चाचा भार उचलावा तरी कुणी?

Plastic Pollution of Goa: गोव्याच्या लोकसंख्येच्या कित्येक पटीने अधिक संख्येने गोव्यात येऊन प्लास्टिक कचऱ्याचे निर्माण करणाऱ्या पर्यटकांवर ‘पर्यटन अधिभार’ लागू करण्याचे आवाहन आता शास्त्रज्ञच करू लागले आहेत.

तिजारा: गोव्याचा समुद्र आणि येथील किनारपट्टी प्रदूषणग्रस्त बनल्याचे आम्ही गृहीत धरले असतानाच, आमच्या सुंदर राज्याचा सागर देशातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष भारत सरकारनेच काढला आहे.

पर्यावरण व विज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय किनारी संशोधन केंद्राने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे, की किनारी राज्यांमध्ये गोव्यातील किनाऱ्यांवर आढळणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण ५३ टक्के असून तेथे बिगर प्लास्टिकचेही प्रमाण ४७ टक्के आहे, जे भीषण आहे.

गोव्याच्या लोकसंख्येच्या कित्येक पटीने अधिक संख्येने गोव्यात येऊन प्लास्टिक कचऱ्याचे बेजबाबदारीने निर्माण करणाऱ्या पर्यटकांवर ‘पर्यटन अधिभार’ लागू करण्याचे आवाहन आता शास्त्रज्ञच करू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com