single-use plastic Dainik Gomantak
गोवा

Single Use Plastic: राज्य प्रदूषण मंडळ अॅक्शन मोडमध्ये; अवैध प्लास्टिकवरील छापेमारीने अनेकांचे धाबे दणाणले

''अवैध प्लास्टिकवरील कारवाई यापुढेच सुरुच राहणार''

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील नागरीक आणि पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उपल्बध व्हाव्यात तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये. यासाठी राज्य प्रदूषण मंडळ सातत्याने प्रयत्नशिल असते. याचाच भाग म्हणून आज राज्य प्रदूषण मंडळाने अवैध प्लास्टिक ( single use plastic ) वापरणाऱ्यांवर छापे टाकत कारवाई केली.

(Goa State Pollution Control Board conducts raids in Goa against single-use plastic)

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत प्रदूषण मंडळाने नियमबाह्य प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. असे असले तरी कारवाईच्या नेमक्या ठिकाणांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

या कारवाईत प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुमारे 73,800 रुपयाचे प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या साहित्यामध्ये पाणी पिण्याचे ग्लास, चहा पिण्याचे ग्लास, द्रोण यासह इतर साहित्याचा देखील समावेश आहे. मुख्य बाजारपेठेत कारवाई सुरु केल्यानंतर असे साहित्य विक्री करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी ते लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेगाने कारवाई करत अनेकांची धरपकड केली आहे. यावेळी काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, अवैध प्लास्टिकवर कारवाई यापुढे सुरुच राहणार आहे. कारण याबाबतच्या तक्रारी देखील वाढल्याचं त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT