गोव्यात सध्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू आहे. देशभरातील विविध राज्यातील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून राज्यासाठी पदक मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॅंडबॉल यासारखे बरेच खेळ या स्पर्धेत पाहायला मिळतात.
या खेळांसोबतच यावर्षी भारतातील पारंपरिक समाजला जाणारा ‘लगोरी’ या खेळाला ‘प्रदर्शनीय खेळ’ म्हणून सहभागी करून घेण्यात आले आहे. या खेळाची ओळख व्हावी ह्या मुख्य उद्देशाने देशभरातील ८ संघांमध्ये हा खेळ खेळला जाणार आहे.
गोव्यात २०१३ साली पहिल्यांदा ‘लगोरी असोशीएशन ऑफ गोवा’ ची स्थापना करण्यात आली. आपल्या स्वदेशी आणि पारंपरिक खेळांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर ओळख व महत्व निर्माण करून देणे आणि त्याचा प्रचार व प्रसार करणे हा एकमेव उद्देश यामागे होता.
एल. डी. सामंत शाळेत शिकविणाऱ्या शारीरिक शिक्षिका कीर्ती सावईकर यांनी सर्वप्रथम हा विचार मांडला आणि मग राज्यातील इतर शारीरिक शिक्षकांनी त्यांना पाठिंबा देत असोसिएशन ची स्थापना केली. यासाठी त्यांना महाराष्ट्रामधील कै. संतोष गुरव यांची खूप मदत झाली.
लगोरी हा पारंपरिक खेळ असून तो फक्त मनोरंजनासाठी खेळला जायचा पण संतोष गुरव यांनी त्या खेळला खूप विचारपूर्वक नियम व अटी घालून स्पर्धात्मक खेळाचे रूप दिले. २००९ साली ‘लगोरी फेडरेशन ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन करायला त्यांचा मोलाचा वाटा आहे.
ते हयात असताना वेगवेगळ्या ३६ देशांमध्ये लगोरी खेळाचा प्रचार आणि प्रसार गुरव यांनी केला. लगोरीच्या राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा देखील त्यांनी आयोजित केल्या होत्या. २०१३ साली गोव्यात मडकई येथे या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा भरविली गेली होती.
गेल्या १० वर्षात गोव्यामध्ये लगोरीसाठी अनुकूल वातावरण आहे. देश पातळीवर देखील राज्याचे नाव नेहमी वरच्या क्रमांकात असते. गोवा राज्याचे क्रीडा खाते आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा यांनीही आता या खेळाकडे लक्ष देत वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा भरविण्यास चालू केल्या आहे.
एका महिन्यांपूर्वी हरियाणा इथे झालेल्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत गोव्याच्या पुरुष आणि महिला संघाने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान प्राप्त केले. तसेच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत १९ वर्षाखालील लगोरी सांगणे विजेतेपद पटकाविले आहे.
ह्या वर्षी गोव्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देखील गोवा राज्यासाठी लगोरीमध्ये पदक मिळविण्याची संधी होती. परंतु मुख्य स्पर्धेत या खेळाचा समावेश न करता ‘प्रदर्शनीय खेळ’ म्हणून हा खेळ ८ विविध संघांमध्ये खेळला जाणार आहे.
१० वर्षांच्या ‘लगोरी असोसिएशन ऑफ गोवा’ च्या कारकिर्दीत प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीवर गोव्याने पदकं पटकावेलेली आहे. त्याच प्रमाणे निकिता नाईक या गोव्याच्या सीनियर लगोरी खेळाडूची ह्या वर्षी ‘स्पर्धा मेनेजर’ म्हणून ३७ व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत निवड झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.