National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 3 खेळाडू जखमी; महाराष्ट्राच्या खेळाडूवर शस्त्रक्रिया

बांबोळी रूग्णालयात उपचार; दोघे रग्बीचे खेळाडू तर एक जण वेटलिफ्टर
National Games 2023 | 3 players Injured
National Games 2023 | 3 players Injured Dainik Gomantak

National Games 2023: गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विविध स्पर्धांमध्ये गुरूवारी 3 खेळाडू जखमी झाले. त्यांना दुखापत झाली आहे. सध्या बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यातील दोघेजण रग्बीचे खेळाडू आहेत तर एकजण वेटलिफ्टर आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

National Games 2023 | 3 players Injured
National Games Goa 2023: अभिमानास्पद! सांगे येथील बाबू गावकरकडून गोव्याला पहिले सुवर्ण

महाराष्ट्राच्या रग्बी संघातील खेळाडू भरत चौहान (वय २७) याला बुधवारी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पणजीजवळील सरकारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसी) नेण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

तर गोवा संघाचा रग्बी खेळाडू सोहन शिरोडकर (वय २५) हा देखील एका कार्यक्रमात जखमी झाला होता आणि त्याला बुधवारी रात्री GMC मध्ये दाखल करण्यात आले होते, असे रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

तर केरळ संघातील वेटलिफ्टर बिस्वा वर्गुसे (वय २६) याला दुखापतीमुळे मंगळवारी जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

National Games 2023 | 3 players Injured
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

गुरूवारी गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी या तिन्ही जखमी खेळाडूंची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. हे खेळाडू पुन्हा तंदुरूस्त व्हावेत, यासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासनही दिले.

पत्रकारांशी बोलताना गावडे म्हणाले की, राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जीएमसी ने वैद्यकीय सुविधा उभारली आहे. राज्य सरकार सर्व खेळाडूंची काळजी घेईल.

दरम्यान, GMC मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी एक विशेष वॉर्ड स्थापन केला आहे. त्यात सर्व गरजांची पुर्तता केली गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com