Sanquelim Goa State Consumer Rights Day CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa State Consumer Rights Day: नोकरी सांभाळून व्यवसाय करणाऱ्यास सर्वोतोपरी सहकार्य; मुख्यमंत्री सावंत

Sanquelim News: साखळीत गोवा ग्राहक हक्क दिन कार्यक्रम साजरा; प्रत्येक घरात उद्योग व एक उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याचा अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय पातळीवर विकास करताना मानवी विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचसाठी ‘प्रत्येक घरात उद्योग व एक उद्योजक’ निर्माण करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.

स्वयंपूर्ण गोवा (Goa) संकल्पनेतून आपली नोकरी सांभाळूनही धंदा व्यवसाय करणाऱ्या गोवेकरांसाठी सरकारच्या विविध खात्यांकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य मिळणार आहे. पण त्यासाठी गोवेकरांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

राज्य सरकारच्या कायदा मोजमाप खात्यातर्फे गोवा राज्य ग्राहक हक्क दिनानिमित्त स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास मंडळ, नियोजन, संख्यांकन व मोजमापन खाते, अन्न व औषध संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पेकर्स प्रमाणपत्र व अन्न सुरक्षा परवाना प्रदान करण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष रश्मी देसाई, कायदा मोजमाप खात्याचे सचिव संजित रॉड्रिगीस, नियोजन, संख्यांकन व मोजमापन खात्याचे संचालक विजय सक्सेना, ग्रामीण विकास मंडळाचे संचालक गोपाळ पार्सेकर,

कायदा मोजमाप खात्याचे नियंत्रक अरूण पंचवाडकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी दिपाली नाईक, अन्न व औषध खात्याच्या अधिकारी संज्योत कुडाळकर, स्वयंपूर्ण गोवाचे सल्लागार गौतम खरंगटे, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक संगम पाटील उपस्थित होते.

स्वयंपूर्ण गोवाच्या पहिल्या टप्प्यात सर्व पंचायतींमध्ये येणाऱ्या स्वयंपूर्ण मित्रांकडून गावातील विविध समस्यांवर लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यात खऱ्या अर्थाने लोकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्व खात्यांना सक्रिय बनविण्यात आले आहे.

स्वयंसहाय्य गट, महिला मंडळे तसेच स्वतःहून विविध प्रकारचे पदार्थ बनविणाऱ्या लहान सहान व्यवसायिकांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी योग्य व्यासपीठ मिळावे. त्याला बाजारपेठ मिळावी.

त्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढावा, यासाठी अन्न सुरक्षा परवाना तर उत्पादनातील आकर्षकता वाढविण्यासाठी दर्जेदार पॅकिंग व्हावे, यासाठी पेकर्स प्रमाणपत्र दिले जात आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

या कार्यक्रमात पॅकर्स प्रमाणपत्र तसेच अन्न सुरक्षा परवाना मिळालेल्या महिलांना प्रमाणपत्रे व परवाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन रंजना मळीक यांनी केले, तर आभार अरूण पंचवाडकर यांनी मानले.

फसव्यांवर कारवाई

गोव्याबाहेरील पदार्थ, वस्तू आणून त्याचे पॅकिंग, लेबलिंग गोव्याचे असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या घटकांवर सरकार लक्ष आहे. अशा महाभागांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गोव्याच्या बाहेरील काजूगर आणून तो गोव्याचा म्हणून विकला जातो. अशा लोकांवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

PWD मंत्री दिगंबर कामत Action Mode मध्ये, बायणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास अचानक दिली भेट

मित्राच्या बर्थडे पार्टीवरुन परत येताना काळाने गाठले; फाईव्ह स्टार हॉटेलच्या फ्रंट ऑफिसरचा अपघाती मृत्यू

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

SCROLL FOR NEXT