Goa Today's News: डिचोलीत वादळी पावसामुळे हाहाकार...!

Goa Today's 26 June 2024 Live News: आसगाव घर मोडतोड आणि अपहरण प्रकरण, गुन्हे, राजकारण, पर्यटन, मॉन्सून, कला, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
bicholim rain
bicholim rain

डिचोलीत वादळी पावसामुळे हाहाकार...!

डिचोलीत वादळी पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली. घर, स्वछतागृहासह चारठिकाणी झाडे कोसळली. या पावसामुळे तब्बल तीन लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेची नुकसान झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत GST कौन्सिलच्या मंत्रिगटाच्या निमंत्रकपदी

जीएसटी कौन्सिलने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी मंत्रिगटाचे (GoM) निमंत्रक म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बिहारचे उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि केरळचे अर्थमंत्री सदस्य.

Taxi Driver Attacked: टॅक्सी चालकावर हल्ला, संशयिताला 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी

टॅक्सी चालक सुभाष पांडुरंग सावंत यांच्यावर प्रवासी लेनी पीटर सिमोसकडून हल्ला. आरोपी सिमोसला 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी. अधिक तपास सुरु.

Goa Rain Update: डिचोलीत वादळी पावसाचा तडाखा..!

डिचोलीत विविध ठिकाणी झाडांची पडझड. घर, स्वछतागृहासह चारठिकाणी झाडे कोसळली. तीन लाखांहून अधिक रुपयांच्या मालमत्तेची नुकसानी.

Goa Power Theft Issue: गोव्यात वीज चोरी रोखण्यासाठी वीज खात्याचे मोठे पाऊल

वीज चोरी रोखण्यासाठी गोव्यातील प्रत्येक घराची अभियांत्रिकी तपासणी केली जाईल. विद्युत यंत्रणेची अखंडता राखण्यासाठी वेळेवक दुरुस्ती केली जाईल, अशी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

Mahadayi Water Dispute: 'प्रवाह' करणार म्हादई नदीची पाहणी, कळसा भांडुरालाही देणार भेट

म्हादई प्रवाह समिती 4 आणि 5 जुलै रोजी म्हादई नदीची पाहणी करणार. सात जुलैला कळसा भांडुरासह कर्नाटकच्या हायड्रो प्रकल्पाला भेट देणार. तर, 8 जुलै रोजी बंगळुरुत होणार प्रवाह समितीची बैठक. जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकरांची माहिती.

गोवा खंडपीठाच्या नव्या इमारतीतील समस्यांबाबत सॉलिसिटर जनरल यांचे GSIDC ला पत्र

पर्वरीतील मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाच्या नव्या इमारतीचे डिझाईन फसलेले. इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग, पाणी गळती, सेंट्रल एसी, फॉल्स सिंलिंग कोसळणे यासारख्या समस्यांबाबत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. प्रविण फळदेसाई यांची GSIDC च्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून त्वरीत लक्ष घालण्याची विनंती.

E-Buses In Panjim: पणजीत 01 जुलैपासून ई-बसेस सुरु होणार

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या योजनेखाली वाहतूक व्यवस्थापन नियोजनानुसार खासगी प्रवासी बसेसऐवजी पणजीत प्रवासी ई-बसेस 01 जुलैपासून सुरू होणार. ॲड. जनरल देविदास पांगम यांची स्वेच्छा याचिकेत उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला माहिती. ई-बसेस सुरु करण्यास खंडपीठाने मुदतवाढ. 03 जुलैला पुढील सुनावणी.

Asgaon Goa House Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरण, तपास गुन्हे शाखेकडे

आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्य सचिव करणार चौकशी अहवाल सादर. दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन.

शाळा, मंदिराजवळ दारु दुकांनाना परवानगी! मुख्यमंत्री पुन्हा विचार करणार

गोवा सरकारकडून शाळा व मंदिर परिसरात दारूच्या दुकानांना परवानगी देण्यासंदर्भात पुन्हा विचार करणार, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ बदलाचा मुख्यमंत्र्यांना विशेष अधिकार - प्रदेशाध्यक्ष तानावडे

राज्यात मंत्रिमंडळ बदल होणार असल्याचा चर्चा सुरु असून, याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी हा मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला पक्ष म्हणून आमचा पाठिंबा असेल, असे तानावडे म्हणाले.

Goa Weather Update: उत्तर आणि दक्षिण गोव्यात येत्या ३-४ तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Bicholim Accident: डिचोलीत चौपदरी बगलमार्गावर ट्रक रुतला

डिचोलीत चौपदरी बगलमार्गावर अवजड ट्रक रुतला. अनर्थ टळला. बगलमार्गावर अपघातांचे सत्र सुरूच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com