Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: गोव्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी! शासकीय विभागातील 230 पदे भरली जाणार; कसा कराल अर्ज? वाचा..

Goa Recruitment: महत्त्वाच्या पदांमध्ये तलाठी ३० पदे, प्रयोगशाळा सहायक - ४६ पदे, पंचायत सचिव २६ पदे, लेखा लिपिक- १२ पदे, माहिती सहायक ६ पदे यांचा समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा कर्मचारी निवड आयोगाने राज्यातील विविध शासकीय विभागांसाठी एकूण २३० पदांची (गट-क) मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ ठेवली आहे.

जाहिरातीमध्ये शोधक, कायदेशीर मापन निरीक्षक, मत्स्य सहाय्यक, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औद्योगिक निरीक्षक, पंचायत सचिव, तलाठी, स्टोअर कीपर अशा विविध पदांचा समावेश आहे. काही पदे मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, महिला, माजी सैनिक व अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या पदांमध्ये तलाठी ३० पदे, प्रयोगशाळा सहायक - ४६ पदे, पंचायत सचिव २६ पदे, लेखा लिपिक- १२ पदे, माहिती सहायक ६ पदे यांचा समावेश आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी काही पदांवर विशेष आरक्षण देण्यात आले असून लो-व्हिजन, हार्ड ऑफ हियरिंग, ल्लोकॅमोटर डिसॅबिलिटी, बौद्धिक दिव्यांगत्व अशा श्रेणींचा समावेश आहे.

उमेदवारांनी आयोगाच्या www.goaonline.gov.in या संकेतस्थळावरून सूचनांनुसार अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा आणि पुढील प्रक्रिया याबाबत माहिती आयोग नंतर जाहीर करणार आहे.

अशी आहेत पदे

शोधक - १ पद, मत्स्यव्यवस्थापन साहाय्यक अधीक्षक - १ पद, कायदेशीर मोजमाप निरीक्षक (कनिष्ठ) - १ पद, कनिष्ठ भूगर्भशास्त्र अधिकारी - ३ पदे, साहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - ७ पदे, साहाय्यक अभिलेख अधिकारी - २ पदे, अव्वल कारकून - १२ पदे, माहिती साहाय्यक - ६ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १२ पदे, औद्योगिक निरीक्षक - १ पद, तांत्रिक साहाय्यक - ६ पदे,

प्रयोगशाळा साहाय्यक - १४ पदे, वन विभागाचा प्रयोगशाळा साहाय्यक - १ पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (प्रथम श्रेणी) - १ पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (द्वितीय श्रेणी) - ७ पदे, विश्लेषण साहाय्यक (प्रथम श्रेणी) - १ पद, साठागृह/गोदाम रखवालदार - ४ पदे, सर्वेक्षक - जनगणना/आकडेवारी विभाग - २१ पदे, खजिनदार (तृतीय श्रेणी) - ९ पदे, लेखापाल लिपिक - १२ पदे, कनिष्ठ संशोधन साहाय्यक - २ पदे, ग्रामपंचायत सचिव - २६ पदे, प्रयोगशाळा साहाय्यक (अतिरिक्त) - १ पद, तलाठी - ३० पदे, मत्स्य सर्वेक्षक - २ पदे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

Goa Karnataka Water Dispute: 'कळसा'च्या अनुभवातून गोव्याने धडा घ्यावा! म्हादई हा केवळ विरोधी पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण गोव्याचा प्रश्‍‍न

Ration From Digital Currency: रेशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! आता क्यूआर कोड स्कॅन करताच मिळणार रेशन; ना कागदपत्रे, ना कॅशची गरज

स्वातंत्र्यदिनी क्रिकेटविश्वाला मोठा धक्का! दोन दिग्गजांनी 15 ऑगस्टला घेतली निवृत्ती, एकाच्या नावावर 3 'ICC' ट्रॉफींचा विक्रम

Goa Social Welfare Scheme: गोमंतकीयांसाठी सुरक्षित आसरा अन् नव्या आयुष्याची संधी; ‘निवारा गृह’ योजनेत शिक्षणापासून व्यावसायिक प्रशिक्षणापर्यंत सुविधा

SCROLL FOR NEXT