पणजी: गोव्यात आगामी निवडणुकांमध्ये अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी दिली.
यासंदर्भातील प्रक्रियेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी दर दोन दिवसांनी समन्वय साधत असून, राज्य नेतृत्वाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे तवडकर यांनी सांगितले. एसटी समाजाची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी जनगणना आयुक्तांच्या नियुक्तीबाबत विलंब होत असला तरी प्रक्रिया विस्कळीत झाली नसल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले. संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून काम पुढे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
एसटी आरक्षणासाठी लोकसंख्येची पडताळणी, मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करणे आणि त्यानंतरची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या सर्व बाबींवर सरकारचे लक्ष असून, आगामी निवडणुकांपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून एसटी समाजाला राजकीय आरक्षणाचा लाभ मिळेल, असा विश्वास तवडकर यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.