Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

Goa IDC E Auction 50 Plots: वेर्णा येथील ‘हॅलो वर्ल्ड इनोव्हेशन अँड रिसर्च पार्क’मधील तीन भूखंडांसह वेर्णा, लाटंबार्से आणि किटला येथील ५० भूखंडांचा ई–लिलाव करण्‍याचे राज्‍य सरकारने निश्‍चित केले आहे.
Goa IDC E Auction 50 Plots
Goa IDC E AuctionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: वेर्णा येथील ‘हॅलो वर्ल्ड इनोव्हेशन अँड रिसर्च पार्क’मधील तीन भूखंडांसह वेर्णा, लाटंबार्से आणि किटला येथील ५० भूखंडांचा ई–लिलाव करण्‍याचे राज्‍य सरकारने निश्‍चित केले आहे. उद्योग विकास महामंडळाने (आयडीसी) याबाबतची नोटीस जारी केली आहे.

वेर्णा येथील ‘हॅलो वर्ल्ड इनोव्हेशन अँड रिसर्च पार्क’मधील ई–लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या तीन भूखंडांसाठी संशोधन, आयटी/आयटीईएस, डेटा सेंटर्स, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग हे मुख्य केंद्रबिंदू आहेत. यातील दोन भूखंड प्रत्येकी २५ हजार चौरस मीटरचे आहेत, तर तिसरा भूखंड २९,९०० चौरस मीटरचा आहे. प्रति चौरस मीटर चार हजार रुपये या मूळ किमतीसह या भूखंडांचा लिलाव येत्‍या २ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.

याव्यतिरिक्त, वेर्णा येथे १,१५४ ते ८० हजार चौरस मीटर आकाराच्‍या १७ भूखंडांचा मूळ किंमत ५,७०० रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे, लाटंबार्से येथील अन्न आणि पेय उद्योगांसाठी राखीव असलेल्‍या ५९९ ते २४,६६० चौरस मीटर आकाराच्‍या १४ भूखंडांचा मूळ किंमत ४,५०० रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे आणि किटला येथील १,४३५ ते २,४६४ चौरस मीटर आकाराच्या १६ भूखंडांचा मूळ किंमत चार हजार रुपये प्रति चौरस मीटर यानुसार ई–लिलाव होणार असल्‍याचे नोटिशीत म्‍हटले आहे.

Goa IDC E Auction 50 Plots
Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

दरम्‍यान, वेर्णातील भूखंडांसाठी बोली लावण्‍यासाठी २८ ऑक्‍टोबर, लाटंबार्सेसाठी २९ आणि ३० ऑक्‍टोबर, किटलासाठी ५ आणि ६ नोव्‍हेंबर, तर ‘हॅलो वर्ल्ड इनोव्हेशन अँड रिसर्च पार्क’मधील भूखंडांसाठी बोली लावण्‍यासाठी २ ते ४ नोव्‍हेंबर अशा तारखा देण्‍यात आलेल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com