Tanaya Naik and Purva Bhaidkar Dainik Gomantak
गोवा

Women's ODI Cricket Tournament: पूर्वा, तनयाने साकारला गोव्याचा विजय

Women's ODI Cricket Tournament: ओडिशावर सहा विकेट राखून मात

किशोर पेटकर

Women's ODI Cricket Tournament: पूर्वा भाईडकर (६८) व तनया नाईक (३७) यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या शंभर धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे गोव्याने २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद केली. सोमवारी मुंबई येथील एमआयजी क्लब मैदानावर त्यांनी ओडिशाला सहा विकेट राखून हरविले.

गोव्याने ओडिशाचा डाव १६३ धावांत गुंडाळला, विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याची ४ बाद ६६ अशी घसरण झाली होती. त्यानंतर पूर्वा व तनया यांनी शानदार फलंदाजी केली.

पूर्वाने ९० चेंडूंतील खेळीत पाच चौकार मारले. तनया हिने संयमी फलंदाजीत ८७ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. या दोघींच्या दमदार फलंदाजीमुळे ओडिशाला स्पर्धेतील तिसरा पराभव पत्करावा लागला. गोव्याचे आता सहा सामन्यांतून १२ गुण झाले आहेत.

संक्षिप्त धावफलक

ओडिशा: ४४.३ षटकांत सर्वबाद १६३ (रोशनी बागार्ती ३२, जी. एम. अलकनंदा ३१, तरन्ना प्रधान २८, पूर्वा भाईडकर १०-२-२०-२, मेताली गवंडर १०-१-१९-१, तनया नाईक १०-१-३२-१, सेजल सातार्डेकर ६.३-०-३१-३, सावली कोळंबकर ४-०-२४-०, पूर्वजा वेर्लेकर ४-०-२८-०) पराभूत वि. गोवा: ४१.५ षटकांत ४ बाद १६६ (पूर्वजा वेर्लेकर ३५, कृपा पटेल ७, मेताली गवंडर १, पूर्वा भाईडकर नाबाद ६८, दिव्या नाईक १, तनया नाईक नाबाद ३७, सूर्यास्नता स्वेन २-२३, बिजया बेहेरा २-१८).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT