Priyank Panchal Dainik Gomantak
गोवा

Ranji Cricket: गोव्याच्या रणजी संघावर नामुष्की

Ranji Cricket: गुजरातविरुद्ध पराभूत: स्पर्धेतील पाचव्या पराभवामुळे प्लेट गटात पदावनती

किशोर पेटकर

Ranji Cricket: संघनिवडीतील असमतोलता, फक्त चार खेळाडू वगळता इतरांकडून निराशा, खेळाडूंत सातत्य आणि आत्मविश्वासाचा अभाव, दिशाहीन मार्गदर्शन, तसेच पाहुणे क्रिकेटपटू निवडताना झालेली चूक या पार्श्वभूमीवर गोव्याच्या रणजी क्रिकेट संघावर रविवारी नामुष्की ओढविली.

एलिट क गटातील सात लढतीतील पाचव्या पराभवामुळे त्यांना चार गुणांसह तळाचे स्थान मिळाले, त्यामुळे प्लेट गटात पदावनती झाली. गुजरातने सात विकेट राखून दणदणीत विजय नोंदविला.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर चार दिवसीय सामन्याचा तिसरा दिवस नाट्यमय ठरला. दिवसभरात १८ विकेट पडल्या. गोव्याच्या पहिल्या डावातील ३१७ धावांना उत्तर देताना गुजरातने पहिल्या डावात ५ बाद २८१ वरून रविवारी उपाहारापूर्वी ३४६ धावा केल्या.

त्यांना २९ धावांची आघाडी मिळाली. सकाळच्या सत्रात अर्जुन तेंडुलकरने (४-४९) भन्नाट मारा केल्यामुळे गुजरातची आघाडी जास्त वाढली नाही. त्यांचा सलामीचा प्रियांक पांचाळ याने १७१ धावांची (२६७ चेंडू, १७ चौकार, ४ षटकार) खेळी केली.

नंतर गोव्याची दुसऱ्या डावात दाणादाण उडाली व त्यांचा डाव चहापानाला १४३ धावांत आटोपला. गुजरातला ११५ धावांचे आव्हान मिळाले.

तिसऱ्या दिवसाचा खेळ वाढविण्यात आल्यानंतर अतिरिक्त वेळेतील १३ मिनिटांच्या खेळात गुजरातने दुसऱ्या डावात ३ बाद ११७ धावा करून सामना जिंकला.

शेवटचा रणजी सामना खेळणाऱ्या अमोघ देसाईच्या चेंडूवर हेत पटेल याने कव्हर्समधून शानदार चौकार लगावत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखालील गुजरातचा हा सात सामन्यांतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता एलिट क गटात २५ गुण झाले आहेत.

बाद फेरीत जागेसाठी गुजरातला कर्नाटक (२४ गुण) विरुद्ध चंडीगड, तमिळनाडू (२२ गुण) विरुद्ध पंजाब यांच्यातील सोमवारी संपणाऱ्या सामन्यापर्यंत थांबावे लागेल. गोव्याविरुद्ध गुजरातचा प्रियांक पांचाळ सामन्याचा मानकरी ठरला.

मोसमातील खराब कामगिरी

गोव्याला रणजी करंडक स्पर्धेतील खराब कामगिरीस सामोरे जावे लागले. सात सामन्यांत पाच पराभव व दोन बरोबरी यामुळे त्यांच्या खाती फक्त चार गुण जमा झाले व त्यांना एलिट क गटात शेवटचा आठवा क्रमांक मिळाला.

यापूर्वी २०१८-१९ मोसमात नऊपैकी सात सामने गमावल्यामुळे गोव्याला २०१९-२० मोसमात प्लेट गटात खेळावे लागले होते. सातव्या फेरीपूर्वी संयुक्त एलिट विभागात गोवा व हिमाचल प्रदेश यांचे समान चार गुण होते.

सातव्या फेरीत हिमाचल प्रदेशने पुदुचेरीला डाव व ६३ धावांनी हरविले. त्यामुळे बोनस गुणासह त्यांचे ११ गुण झाले व पदावनती टळली. पराभवामुळे गोव्याचा संघ ३१व्या स्थानी राहिला, तर मणिपूरला सर्व सातही सामन्यांत पराभूत व्हावे लागल्याने ३२वा क्रमांक मिळाला.

नियामवलीनुसार, आता २०२४-२५ मोसमात गोवा आणि मणिपूर संघ प्लेट गटात खेळेल, तर एलिट गटातील त्यांची जागा हैदराबाद व मेघालय हे संघ घेतील.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ३१७

गुजरात, पहिला डाव (५ बाद २८१ वरून) : ९६.५ षटकांत सर्वबाद ३४६ (प्रियांक पांचाळ १७१, रवी बिष्णोई ३०, सिद्धार्थ देसाई १३, अरझान नागवसवाला नाबाद १४, लक्षय गर्ग ११.१-१-५५-१, अर्जुन तेंडुलकर २१-३-४९-४, दीपराज गावकर १२-१-४२-०, हेरंब परब २०.५-३-७५-०, दर्शन मिसाळ २०.५-३-७२-२, मोहित रेडकर ११-०-३९-१).

गोवा, दुसरा डाव: ३७.४ षटकांत सर्वबाद १४३ (सुयश प्रभुदेसाई ०, अमोघ देसाई ४, मंथन खुटकर २५, के. व्ही. सिद्धार्थ ०, स्नेहल कवठणकर २९, दीपराज गावकर ०, दर्शन मिसाळ ३९, अर्जुन तेंडुलकर १४, मोहित रेडकर ९, लक्षय गर्ग नाबाद १२, हेरंब परब ७, चिंतन गजा २-२९, अरझान नागवसवाला १-१७, प्रियजितसिंह जडेजा ३-२९, सिद्धार्थ देसाई २-४०, रवी बिष्णोई १-१०).

गुजरात, दुसरा डाव: २९.३ षटकांत ३ बाद ११७ (प्रियांक पांचाळ १२, आदित्य पटेल नाबाद ३८, रवी बिष्णोई १८, हेत पटेल नाबाद ४६, अर्जुन तेंडुलकर ६-०-१८-१, लक्षय गर्ग ३-१-२-०, दीपराज गावकर ३-०-११-१, दर्शन मिसाळ ४-१-१९-०, मोहित रेडकर ५-१-२३-०, अमोघ देसाई २.३-०-१०-०, मंथन खुटकर १-०-६-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT