I-League 2 Football Tournament:  Dainik Gomantak
गोवा

I-League 2 Football Tournament: स्पोर्टिंग क्लबला विजयाची हुकलावणी; सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध 1-1 गोलबरोबरी

I-League 2 Football Tournament: वास्को येथील टिळक मैदानावर ही लढत झाली

किशोर पेटकर

I-League 2 Football Tournament: सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना गोल स्वीकारल्यामुळे आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला विजय हुकला.

वास्को येथील टिळक मैदानावर रविवारी झालेल्या लढतीत त्यांना सुदेवा दिल्ली एफसीने १-१ असे गोलबरोबरीत रोखले.

संघातील नवा खेळाडू मार्क कार्व्हालो याने चौथ्या मिनिटास केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब विजयाच्या दिशेने कूच करत होता.

८५व्या मिनिटास आश्रय भारद्वाज याने केलेल्या गोलमुळे सुदेवा दिल्ली संघाने पिछाडी भरून काढली. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेतील आणखी एका सामन्यात पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे युनायटेड स्पोर्टस क्लबने स्पोर्टिंग क्लब बंगळूरला १-० असे निसटते नमविले.

85व्या मिनिटास साहिल हरिजन याने केलेल्या गोलमुळे युनायटेड क्लबच्या मोहिमेला विजयाने सुरवात झाली.

स्पर्धेत २७ जानेवारी रोजी गोव्याच्या दोन्ही संघांचे पुढील सामने होतील. स्पोर्टिंग क्लब द गोवासमोर केंकरे एफसीचे, तर धेंपो स्पोर्टस क्लबसमोर एफसी बंगळूर युनायटेडचे आव्हान असेल.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर बंगळूर युनायटेड व युनायटेड स्पोर्टस क्लबचे प्रत्येकी तीन, तर धेंपो क्लब, ऑरेंज एफसी, स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि सुदेवा दिल्ली एफसीच्या खाती प्रत्येकी एक गुण आहे. स्पोर्टिंग क्लब बंगळूर व केंकरे एफसी संघाने गुण नोंदवलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT