Women's One Day Cricket: अनुश्री देसाईची फिजीओ म्हणून निवड; दक्षिण विभागासाठी काम करणार

Women's One Day Cricket Tournament:- अनुश्री देसाई ही गोव्याच्या वरिष्ठ महिला टीमची फिजीओ म्हणून कार्यरत आहे.
Anushri Desai
Anushri Desai Dainik Gomantak
Published on
Updated on

Women's One Day Cricket Tournament: बरोडा येथे येथे होणाऱ्या आंतर विभागीय वरिष्ठ महिला एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागाचा जो संघ निवडण्यात आला आहे त्या संघाची फिजीओ म्हणून गोव्याच्या अनुश्री देसाई यांची निवड करण्यात आली आहे.

अनुश्री देसाई ही गोव्याच्या वरिष्ठ महीला टीमची फिजीओ म्हणून काम करत असून मागची कित्येक वर्षे ती गोवा क्रिकेट संघटनेसाठी फिजीओ काम करत आहे.

Anushri Desai
Goa Drugs Case: 'हे' निरीक्षण नोंदवत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सोलोमनचा जामीन म्हापसा न्यायालयाने फेटाळला

30 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. गोव्याच्या तरन्नूम पठाण आणि श्रेया परब या दोन खेळाडूंचीही दक्षिण विभाग संघासाठी निवड झाली असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे दक्षिण विभागीय निमंत्रक रोहन गावस देसाई यांनी दिली.

केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत श्रेया हिने सहा सामन्यांत एक वेळ नाबाद राहत ५७.२ च्या सरासरीने २८६ धावा केल्या होत्या तर मेघालयाविरुद्ध तिने १३८ चेंडूंत १७ चौकार व एका षटकारांसह १३९ धावांची झंझावातील खेळी केली होती.

तरन्नूम हिने फलंदाजीत सहा सामन्यांतील पाच डावांत तीन वेळा नाबाद राहत ६७.५ च्या सरासरीने १३५ धावा नोंदविल्या होत्या. राजस्थानविरुद्ध तिने नाबाद अर्धशतक (५२) नोंदविले. फिरकी गोलंदाजीने तिने सहा सामन्यांतील सहा डावात १८.८७ च्या सरासरीने आठ विकेट टिपल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com