Santosh Trophy Dainik Gomantak
गोवा

Santosh Trophy: विजयासह गोवा अव्वल स्थानी, सेनादलावर 2-1 फरकाने मात

Santosh Trophy: गोव्याने संतोष करंडक 77व्या राष्ट्रीय सीनियर फुटबॉल स्पर्धेत रविवारी सेनादलास 2-1 फरकाने नमविले.

किशोर पेटकर

Santosh Trophy: गोव्याने संतोष करंडक 77व्या राष्ट्रीय सीनियर फुटबॉल स्पर्धेत रविवारी सेनादलास 2-1 फरकाने नमविले. या कामगिरीसह त्यांनी अ गटात अव्वल स्थानही प्राप्त केले.

सामना अरुणाचल प्रदेशमधील युपिया येथे गोल्डन ज्युबिली स्टेडियमवर सुरू आहे. सामन्यातील गोलशून्य पूर्वार्धानंतर गोल उत्तरार्धातील अखेरच्या टप्प्यात झाले.

लॉईड कार्दोझ याने 70 व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडत गोव्याला आघाडी मिळवून दिली. 89 व्या मिनिटास जोशुआ डिसिल्वा याच्या गोलमुळे आघाडी भक्का झाली.

जोशुआचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. 90+1व्या मिनिटास पी. ख्रिस्तोफर कामेई याने सेनादलाची पिछाडी एका गोलने कमी केली.

गोव्याचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय ठरला. अन्य एका बरोबरीसह त्यांचे गटात सर्वाधिक सात गुण झाले आहेत.

अगोदरचे दोन्ही सामने जिंकलेल्या सेनादलाचे पहिल्या पराभवानंतर तीन लढतीतून सहा गुण कायम राहिले. ते आता गटात दुसऱ्या स्थानी आहेत. गोव्याचा गटातील पुढील सामना 28 फेब्रुवारीस मेघालयाविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT