Goa Fish Market Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: गोव्यात सुकी मासळीही खातेय भाव; गोवेकरांची प्रचंड मागणी!

Goa Fish Market: गोव्यात जशी ताजी मासळी प्रसिद्ध आहे, तशीच सुक्‍या मासळीलाही मोठी मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Fish Market: गोमंतकीयांचे मुख्य जेवण म्हणजे शीत-कडी. कडी कसली तर मासळीची. गोव्यात जशी ताजी मासळी प्रसिद्ध आहे, तशीच सुक्‍या मासळीलाही मोठी मागणी आहे. ताजी मासळी मिळाली नाही तर गोवेकर सुक्या मासळीवर ताव मारतात.

दरम्यान, अलीकडे सुकी मासळी तयार करण्याचे प्रमाण कमी होत आहे. काही कुटुंबे जिद्दीने हा व्यवसाय करतात. त्यामुळे सुकी मासळी उपलब्ध होते. हा त्यांचा व्यवसाय टिकला पाहिजे. त्यासाठी सरकारची मदत हवी, असे या व्यावयासायिकांचे मत आहे.

पूर्वी सुक्या मासळीचा लोक पुरुमेंत करायचे. पावसाळ्यापूर्वी जेथे फेस्त भरते, तेथे सुकी मासळी विकत घ्यायला लोकांची झुंबड उडायची. सुक्‍या मासळीत सर्वांत लोकप्रिय आणि चवदार असतो तो बांगडा व सुंगटे. या दोन्ही मासळीची कडी, किसमूर किंवा भाजून त्यावर खोबरेल तेल वगैरे घालून खाता येते.

बोंबिल, मोरी, पेडवे, धोडयारेसुद्धा सुकवल्यानंतर खायला मस्‍त लागतात. पूर्वी सुकी मासळी केवळ एप्रिल-मे महिन्यात उपलब्ध असायची. पण आता वर्षभर ती बाजारात मिळते. त्यामुळेच की काय सुक्या मासळीचे आकर्षण लोकांमध्ये कमी झाले आहे.

दक्षिणेत 50 कुटुंबांचा व्यवसाय: दक्षिण गोव्‍यातील कोलवा, बाणावली, केळशी या भागात सुकी मासळी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. या परिसरातील कमीत कमी 50 कुटुंबे या व्‍यवसायावर आपली उदरनिर्वाह चालवतात.

कोलव्यात सुकी मासळी मिळण्याचे खास ठिकाण आहे. तिथे झोपड्या आहेत, जिथे सुकी मासळी एकत्र करून ठेवली जाते. हे लोक पावसाळ्‍यानंतर म्‍हणजे ऑक्‍टोबरपासूनच सुकी मासळी तयार करतात.

मासळीविक्रेती-

हा आमचा पारंपरिक धंदा आहे. मी पाच वर्षांची असल्‍यापासून कुटुंबातील वडीलधाऱ्यांसमवेत मासळी सुकत घालायला मदत करायची. प्रथम ताज्या मासळीतील पाणी काढून घेतले जाते. नंतर ही मासळी मिठात घातली जाते. त्‍यानंतर कमीत कमी तीन आठवडे ती उन्‍हात सुकविली जाते. हा व्‍यवसाय फार कष्‍टाचा असला तरी आता अंगळवणी पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratapgad Fort: 1656 मध्ये जावळी जिंकले, शिवरायांनी किल्ला बांधण्याची आज्ञा दिली; पराक्रमाची गाथा सांगणारा 'प्रतापगड'

Womens World Cup 2025 Final: टीम इंडिया की आफ्रिका? अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? काय सांगतो आयसीसीचा नियम? वाचा

Honeymoon Destinations: गोव्याच्या किनाऱ्यावर रोमान्स, दुबईची 'लक्झरी' लाईफ! हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 10 'रोमँटिक' ठिकाणं, कपल्सची आहे पहिली पसंती

Salim Ali Bird Sanctuary : नद्या खाड्यांनी वेढलेले 'चोडण' बेट, समृद्ध कांदळवन आणि मांडवीतील 'सलीम अली पक्षी अभयारण्य'

Iranian Fisherman: खोल समुद्रात इंजिन पडले बंद, इराणी मच्छीमाराला भारतीय नौदलाकडून जीवदान; गोमेकॉत उपचार सुरु

SCROLL FOR NEXT