Goa Program: कार्यक्रम मंदिराचा, अन् चर्चा मात्र आयआयटीची!

Sanguem Program: धार्मिक कार्यक्रम असला तरी यावेळी प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेचा ठरला.
Sanguem Program
Sanguem ProgramDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sanguem Program: सांगे येथील श्री पाईकदेव देवस्थानच्या नूतन मंदिराचा पायाभरणी सोहळा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडला. धार्मिक कार्यक्रम असला तरी यावेळी प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेचा ठरला. पायाभरणीच्या निमित्ताने सांगेत आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आयआयटी विरोधकांना सुनावत विरोध मागे घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी बांधकामासाठी वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तर, मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दर महिना एक लाख, याप्रमाणे दहा महिन्यांत दहा लाख रुपये देणगी देणार असल्याची जाहीर केले. मुख्यमंत्र्यांपूर्वी मंत्री नीलेश काब्राल, खासदार विनय तेंडुलकर, एनआरआय कमिशनर नरेंद्र सावईकर, आमदार दिगंबर कामत, बाबू कवळेकर यांनी बांधकामाला शुभेच्छा दिल्या.

Sanguem Program
Goa Crime Case: टारझन पार्सेकरवर 'रासुका'खाली कारवाई!

मुख्यमंत्र्यांचा माध्‍यमांना सल्ला

सांगेतील शेतकऱ्यांनी आयआयटी प्रकल्पाविरोधात काल पणजीत निदर्शने केली होती. त्यासंबंधीचे वृत्त वृत्तपत्रांनी प्रकाशित केले होते. त्‍यावर मुख्यमंत्री म्हणाले, चारजण विरोध करतात म्हणून आयआयटी विरोधकांच्या बातम्या पहिल्या पानावर लावताना माध्यमांनी विचार करावा.

गोव्यात विकास हवा की नको, हे पाहून बातम्या प्रकाशित कराव्यात. आझाद मैदानावर आठ-दहाजण एकत्र येऊन विरोध करतात आणि माध्यमे त्‍यांना अधिक महत्त्व देतात, याचा परत एकदा विचार करा. प्रकल्पाच्या बाजूने किती लोक आहेत, याचा विचार करूनच माध्यमानी आपली भूमिका बजावावी.

Sanguem Program
Goa Online Taxi Service : दाबोळीत 15 ऑक्टोबरपासून टॅक्सी ॲप सेवा सुरू

श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री-

संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मंदिरांची उभारणी आवश्यक आहे. पाईकदेव मंदिरासाठी मी शक्य ती मदत करेन. सांगेत आयआयटीसारखा शैक्षणिक प्रकल्प होत असल्यास त्याला सहकार्य करा. कारण अजूनही गोव्यात काही शक्ती विकास होऊ नये म्हणून वावरत आहे.

दिगंबर कामत, आमदार-

गोवा राज्‍य ‘सुपर पॉवर’ होण्यासाटी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. आयआयटी ही सांगेवासीयांना मिळालेली सुवर्णसंधी आहे. ती त्‍यांनी न धुडकवता सांगेचे नाव जागतिक पातळीवर पोचविण्‍यासाठी आयआयटीला सहकार्य करावे.

Sanguem Program
Goa Bench: होर्डिंग्ज उभारण्याबाबत आदेश देऊनही कारवाईकडे 'दुर्लक्ष'

स्मशानभूमीला हात लावणार नाही: नागवे येथील कपेल जमीन प्रकल्पात जात असल्यास, नवीन जागा देण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रकल्पाजवळील स्मशानभूमीला हात लावला जाणार नसल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले. विरोध करण्यासाठी हा रेड झोनमधील प्रकल्प नसून, शैक्षणिक प्रकल्प आहे. त्याला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात अनेकदा केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com