Goa Crime Case: टारझन पार्सेकरवर 'रासुका'खाली कारवाई!

Goa Crime Case: नागवा प्रकरणातील मुख्य आरोपी टारझन पार्सेकर याच्‍याविरोधात कारवाई होणार आहे.
Goa Crime Case | Goa Police
Goa Crime Case | Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Case: नागवा चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी टारझन पार्सेकर याच्‍याविरोधात ‘रासुका’खाली कारवाई होणार आहे. तसेच मनोज शेट्टीचा नाईट क्लब आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. हल्ला झाला त्‍या रात्री क्‍लबवर टारझनच्‍या सेवेसाठी असलेल्‍या मुलींची चौकशी करण्‍यात येणार असल्‍याची माहिती म्हापशाचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

दरम्‍यान, या प्रकरणी पोलिसांनी आज राहुल मयेकर (२०) याला ताब्यात घेतले. सध्‍या त्‍याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री नागवा-हडफडे रस्त्यावर रवी शिरोडकर या युवकावर झालेल्या जीवघेण्या चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनोज शेट्टी व अन्य दोघांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

Goa Crime Case | Goa Police
Old Goa: जुने गोवे परिसरात बेशिस्त पार्किंग

लवकरच त्‍यांच्‍या मुसक्या आवळण्यात येतील असा विश्‍‍वास पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी व्‍यक्त केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात प्रमुख संशयित टारझन याच्‍यासह एकूण 12 जणांना अटक करण्‍यात आलेली आहे. त्यापैकी 10 जणांना दहा दिवस तर काल ताब्यात घेतलेल्या अन्य दोघाना 9 दिवसांची कोठडी सुनावण्‍यात आलीय.

‘त्‍या’ रात्री लुटत होते वाढदिवसाची ‘मजा’

रवी शिरोडकर याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्‍या शनिवारच्‍या रात्री संशयित आरोपी टारझन पार्सेकर हा राजेश (लुडू) केरकर व आपल्या जवळच्या अन्य मित्रांसह स्वत:चा तसेच मित्र राजेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मनोज शेट्टी याच्या ‘एक्स’ या नाईट क्‍लबवर होता.

Goa Crime Case | Goa Police
Vasco Dussehra 2022: अंबाबाई मंदिरात शेकडो भाविकांनी लुटले सोने

यावेळी शेट्टीने टारझनच्‍या सेवेसाठी पाच मुली पुरविल्‍या होत्‍या, अशी माहिती पोलिससूत्रांकडून मिळाली आहे. सीसीटीव्‍ही फुटेजही हणजूण पोलिसांच्या हाती लागल्‍या असून, पोलिस त्‍या मुलींची चौकशी करणार आहेत. या सर्व प्रकारामुळे मनोज शेट्टीचा क्लब सध्या पोलिसांच्या रडारवर आला आहे.

पुन्‍हा कोठडीत

टारझन पार्सेकर याने अंगदुखीची तक्रार केल्याने सोमवारी रात्री त्याला इस्पितळात दाखल करण्‍यात आले होते. काल मंगळवारी डिस्चार्ज मिळाल्‍यानंतर पुन्हा त्‍याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी टारझन याच्याविरोधात कडक भूमिका घेताना त्याला मिळालेला जमीन रद्द करण्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Goa Crime Case | Goa Police
Goa Rescue Operation: दृष्टीच्या जीवरक्षकांकडून समुद्र किनाऱ्यावर बचावकार्य

पोलिसांच्‍या नाकावर टिच्चून खंडणीची वसुली

कुविख्यात गुंड टारझन पार्सेकर हा कळंगुट व परिसरात छोट्या-मोठ्या दुकानांपासून ते हॉटेल, रिसॉर्टच्‍या मालक व चालकांकडून खंडणी वसूल करायचा. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. सहा महिन्यांची तडीपारीची शिक्षा भोगून हल्लीच गोव्यात परतलेल्या टारझनचा अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभाग असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

2010 ते 2013 या तीन वर्षांच्या काळात त्‍याच्याविरोधात खुनाचे प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. मात्र जामिनावर सुटलेल्या टारझनने आतापर्यंत शिक्षेतून कुठलाही धडा न घेता पुन्हा मारामारी तसेच खंडणी वसूल करण्‍याचे प्रकार सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com