Vijay Sardesai | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: ‘सोनसोडो कचरा विल्हेवाटी संदर्भात मी खुल्या चर्चेस तयार’

Vijai Sardesai: आपल्याला सोनसोडोसंदर्भात काहीच माहीत नाही असे त्यांनी म्हणणे चुकीचे आहे.

दैनिक गोमन्तक

Vijai Sardesai: सोनसोडो कचरा विल्हेवाटीसंदर्भात जे प्रश्र्न आज उपस्थित होत आहेत त्यास मडगावचे आमदार दिगंबर कामत व त्यांचे नगरपालिकेतील नगरसेवक जबाबदार असल्याचे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज मडगावात पत्रकारांना सांगितले.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर व नगरपालिका पूर्णपणे त्यांच्या हातात आल्यावर पूर्वीच्या नगरसेवकांनी चुका केल्या असे म्हणणे कामत यांना शोभत नाही. आपल्याला सोनसोडोसंदर्भात काहीच माहीत नाही असे त्यांनी म्हणणे चुकीचे आहे.

गेली 20 ते 25 वर्षे मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक दिगंबर कामत यांच्याच हातात आहेत. त्यामुळे सोनसोडोसंदर्भात जे प्रश्र्न उपस्थित झाले आहेत त्याला कामत जबाबदार नाहीत का? असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला.

आपल्यावर जे नाहक आरोप करण्यात येत आहेत, त्यासंदर्भात खुली चर्चा करण्यास आपण तयार आहे. ही चर्चा मडगावातच व्हावी असा हट्टही आपला आहे. मी दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीच्या परीक्षेत तीन वेळा उत्तीर्ण झालो आहे, तर फातोर्ड्याचे काम भाजपच्या एका नेत्याने केले असे म्हणत कामत जे सांगत आहेत, तोच नेता तीनदा नापास झाला आहे, हे कामत यांनी लक्षात ठेवावे, असेही सरदेसाई म्हणाले.

कॉमेक्सनंतर फॉमेंतो कंपनीना सोनसोडो कचरा प्रकल्पाचे कंत्राट देण्यास कोण जबाबदार आहे हे मडगावकरांना व फातोर्डेकरांना सांगण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

‘निधीअभावी मार्केटचे स्थलांतर रखडले’

घाऊक मासळी मार्केटचे तात्पुरचे स्थलांतर लांबणीवर का पडले या प्रश्र्नाला उत्तर देताना विजय सरदेसाई यांनी सांगितले, की मार्केट स्थलांतरासाठी जी जागा शोधली आहे, त्या जागेवर साधन सुविधा तयार करण्यासाठी अंदाजे 1.5 कोटी रुपयांची आवश्यकता आहे व तेवढीही रक्कम सरकारी तिजोरीत नाही. म्हणूनच हे काम लांबणीवर पडले आहे. जसजसे स्थलांतर लांबणीवर पडत जाईल तसतसा बांधकामाचा खर्च आणखी वाढणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT