Smart Meter Dainik Gomantak
गोवा

Smart Meter: स्मार्ट वीज मीटर प्रकल्प घोटाळाच, 'सिटीझन्स फॉर डेमोक्रेसी'चा आरोप

Smart Meter Scam: राज्याच्या वीज खात्याच्या स्मार्ट वीज मीटर प्रकल्पावर गंभीर आरोप करत सिटीझन्स फॉर डेमोक्रेसीने हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: राज्याच्या वीज खात्याच्या स्मार्ट वीज मीटर प्रकल्पावर गंभीर आरोप करत सिटीझन्स फॉर डेमोक्रेसीने हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. संघटनेचे एल्विस गोम्स आणि अमर गावकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकल्पातील खर्चवाढ, पारदर्शकतेचा अभाव आणि नागरिकांना विश्वासात न घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरवातीला स्मार्ट मीटरसाठी ४९० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, हा खर्च अचानक वाढवून सुमारे ४०० कोटी करण्यात आला आणि एकूण प्रकल्प ८९० कोटी रुपयांवर पोहोचला. वीज खात्याला स्वतः मीटर खरेदी करून बसवणे शक्य असताना हे काम खासगी कंपनीला देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.

केंद्रीय वीज मंत्र्यांनी संसदेत नागरिकांवर स्मार्ट वीज मीटरची सक्ती करू नये, असे स्पष्ट केले असतानाही गोव्यात मात्र सक्ती केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्ष व सत्ताधारी दोघेही यावर गप्प का आहेत, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम आणि अतिरिक्त वीज भार दंड तात्पुरता स्थगित केल्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार मानले असून, हा निर्णय किती काळ लागू राहणार याबाबत स्पष्टता आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT