Goa: Temple Cleaning in Saal. Dainik Gomantak
गोवा

Goa: साळमधील परिस्‍थिती पूर्वपदावर

पुराच्या पाण्यामुळे अनेकांच्या घरात चिखल साचला (Flood In Goa). त्यामुळे पूर्ण रात्र लोकांनी साफसफाई केली.

Mahesh Karpe

साळ : तिळारी धरणातील (Tilari Dam) पाण्याच्या विसर्गामुळे व अतिवृष्टीमुळे साळमध्ये पूर (Flood in Goa) आला. अनेकांच्‍या घरात पाणी शिरले. परंतु आता येथील परिस्‍थिती पूर्वपदावर आली आहे. पुराच्या पाण्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांच्या घरात चिखलाचा थर साचला. त्यामुळे पूर्ण रात्र लोकांनी साफसफाई केली. परंतु जमीन ओली झाल्यामुळे झोपणे कठीण होऊन गेले. काही कुटुंबांनी शेजाऱ्यांकडे आश्रय घेतला, तर काही घरांत चूल पेटली नाही. डिचोलीचे मामलेदार श्री. पंडित यांच्या आदेशानुसार, तलाठी श्री. चोपडेकर यांनी अशा कुटुंबांच्‍या भोजनाची व्यवस्था केली. पंच प्रकाश राऊत व तलाठी श्री. चोपडेकर यांनी अशा कुटुंबांपर्यंत भोजन पोहोचवण्याची व्यवस्था केली होती.

तसेच काल संध्याकाळपर्यंत अग्निशमन दलाचे जवान, देवस्थान समिती व युवकांनी श्री भूमिका, श्री रवळनाथ, श्री वेताळ, श्री महादेव मंदिरात साचलेला गाळ व मातीचा थर धुऊन काढला. तसेच गोविंद परब यांच्या घरासमोरील रस्त्यावर, श्री महादेव मंदिर प्रांगण तसेच भूमिका मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, माती आणि शेणाचे थर साचले होते. ते पाण्याने धुऊन काढण्यात आले. यात अग्निशामक दलाचे जवान रूपेश पळ, बाबुली मांजरेकर, प्रवीण नाईक, फोंडू देसाई व संदीप नाईक यांनी अविरतपणे कष्ट घेतले. त्यांना महादेव भूमिका देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत, सचिव विशाल परब, दत्ताराम परब तसेच महाजन व युवा नेते मेघश्याम राऊत, गुरू नाईक, सुरेश परब, अशोक परब, मुकुंद परब व अन्य युवकांनी मदत केली.

शेती-बागायतीत साचलेय पाणी

शेती व बागायतीतील पाणी अजूनही मोठ्या प्रमाणात साठून आहे. वाहून गेलेल्‍या भाताच्या रोपांच्या ठिकाणी दुसरी लावणी करण्यास शेतकरी अजून शेतात उतरलेला नाही. पण, पाण्यात अडकलेले पॉवर टीलर शेतकऱ्यांनी ओढत सुरक्षित ठिकाणी हलवले. केळी बागायतीत तर अजूनही बागायतदार गेलेला नाही. कारण केळी बागायतीची स्थिती न बघण्यासारखी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT