डिचोली: पूर ओसरला असतानाच, पावसामुळे नार्वे-डिचोली (Bicholim) येथे तीन घरांवर जुनाट आम्रवृक्ष कोसळण्याची घटना घडली. या घटनेत तिन्ही घरांची मोडतोड होऊन हजारो रुपयांची हानी झाली आहे. वित्तहानी वगळता सुदैवाने जीवितहानी किंवा अन्य विपरीत घटना घडली नाही. (Three houses were damaged by falling trees in bicholim, Goa)
देऊळवाडा येथे एकमेकांना टेकून असलेल्या दीपक गावडे, गोपिकी गावडे आणि जगन्नाथ गावस यांच्या घरावर हा भलामोठा आम्रवृक्ष कोसळला. झाड कोसळल्यामुळे तिन्ही घरांची मोडतोड झाली. ऐन पावसात ही आपत्ती कोसळल्याने तिन्ही कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला माहिती मिळताच, पंचनामा करण्याचे निर्देश यंत्रणेचे प्रमुख तथा डिचोलीचे मामलेदार यांनी संबंधित पंचायतीच्या तलाठ्याना दिले. डिचोली अग्निशमन दलाला माहिती देताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदतकार्य करून घरावरील झाड दूर केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.