डिचोली: पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर ओसरला असून, आता तिळारी धरणही शांत झाले आहे. तिळारी धरण तुडूंब भरले असले, तरी मागील दोन दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने तिळारी नियंत्रणात आहे. सद्य स्थितीत तिळारीतून प्रचंड जलविसर्गाचा धोका नाही. अशी माहिती धरण प्रकल्प सूत्रांकडून मिळाली आहे. (Tilari dam did not reach the danger level)
आज दिवसभरात तिळारी धरण परिसरात 11.6 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी सायंकाळपर्यंत तिळारीतील जलसाठ्याची पातळी 109 मीटरच्या आसपास होती. दोन दिवसांपूर्वी गुरुवारी रात्री तिळारीतून मोठ्या प्रमाणात जलविसर्ग झाल्यानंतर शापोरा नदी तुडूंब भरली.
दरम्यान, मध्यरात्री नदी फुटून पहाटे साळ गावाला पुराने वेढा घातला. साळवासियांवर आकांत कोसळला असतानाच शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी होत गेला आणि पूरही ओसरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.