शिवोली मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात माहिती देताना पार्वती नागवेकर. बाजूला दत्ताराम पेडणेकर व हर्षा साळगावकर. Dainik Gomantak
गोवा

शिवोलीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा

गट काँग्रेसच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर यांचा इशारा

Dainik Gomantak

Goa: शिवोली विधानसभा मतदारसंघातील (Siolim Constituency) पाणीपुरवठा (Water supply problems) सुरळीत करावा. हा प्रश्न आठवड्याभरात सोडवला नाही तर स्थानिकांच्या सहकार्याने शिवोली गट काँग्रेस (Congress) आंदोलन (Protest) करील, असा इशारा गटाच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर यांनी सरकारला दिला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा (PWD Mapusa) येथील उपविभाग क्रमांक तीनच्या साहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयाला निवेदन सादर केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसच्या शिवोली गट सेवा दलाचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर व महिला गट अध्यक्षा हर्षा साळगावकर उपस्थित होत्या.

नागवेकर म्हणाल्या, शापोरा येथील ग्रामस्थांची बैठक होऊन गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशी कैफियत ग्रामस्थांनी त्या बैठकीत मांडली. सुमारे सोळा हजार लिटर पाणी लांकांना मोफत उपलब्ध करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात पुरेसा पाणीपुरववठा लोकांना होत नाही.
दत्ताराम पेडणेकर यांनी सांगितले, की कित्येक वेळा आंदोलने करूनही यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याने शिवोली मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहाही पंचायत क्षेत्रांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, ही मतदारसंघातील लोकांची मोठी शांकांतिका आहे. काही भागांत सुमारे बारा तास पाणीपुरवठा होतो, तर अन्य भागांत किमान एक तासही पाणीपुरवठा होत नाही, हीच खरी समस्या आहे. त्यामुळे जलकुंभांना बूस्टर बसवण्यात यावेत व ही समस्या दूर करून शापोरा व बादे भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली.

पाणी समस्येमुळे शापोरा येथील रहिवाशांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. पुरेशा साधनसुविधा निर्माण न करता मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले आहे, हे अतिशय हास्यास्पद आहे. गेल्या सुमारे चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार चंद्रकांत चोडणकर यांच्या प्रयत्नांमुळे शिवोली मतदारसंघात जलवाहिनी उभारण्यात आल्यानंतर अद्याप त्या जलवाहिनीची क्षमता वाढवण्यात आली नाही.

-पार्वती नागवेकर, गट कॉंग्रेस अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT