Dr. Akshaya Madhukar Pawaskar Dainik Gomantak
गोवा

Shiroda PHC: धक्कादायक ! कोरोना योद्धा डॉ. पावस्कर यांची अकाली ‘एक्‍झिट’; कारण अस्‍पष्‍ट

व्हिसेरा राखीव : सेवेत असताना आकस्मिक मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Dr. Akshaya Madhukar Pawaskar's untimely death: कोरोना योद्धा तथा काराय-शिरोडा येथील सरकारी आरोग्य केंद्र डॉ. सखाराम गुडे हॉस्पिटलच्या डॉ. अक्षया मधुकर पावस्कर (वय ३८ वर्षे) यांचा मंगळवारी (ता. १५) रोजी सेवेत असताना आकस्मिक मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

मंगळवारी रात्री सेवेत असताना त्यांनी १७ रुग्णांना तपासले. नंतर कोणी पेशंट नसल्याने डॉ. अक्षया पावस्कर या आपल्या इस्पितळामधील खोलीत गेल्या. दरवाजा लावून त्या कॉटवर झोपल्या. रात्री ९ च्या सुमारास पुन्हा पेशंट आल्याने परिचारिकेने दरवाजा ठोठावला;

परंतु तात्काळ रुग्णांच्या सेवेस धावून येणाऱ्या डॉ. अक्षया यांचा प्रतिसाद न मिळाल्‍याने भ्रमणध्वनीवरून त्यांना कॉल करण्यात आला. पण, डॉ. अक्षया फोन उचलत नसल्याने दरवाजा उघडून पाहिले असता, त्‍या कॉटवर निपचित पडलेल्या आढळून आल्या.

त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, मृत झाल्याचे आढळून आले. नंतर त्यांचा मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. हृदयविकाराने त्‍यांचा मृत्‍यू झाला, असा प्राथमिक तर्क व्‍यक्‍त करण्‍यात आला; तथापि मृत्‍यूचे नेमके कारण पडताळले जात आहे, असे आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी म्‍हटले आहे.

अकाली निधनामुळे हळहळ

एक मनमिळावू, रुग्णांशी प्रेमळपणे वागणाऱ्या हुशार अशा डॉ. अक्षया यांच्या अकाली निधनामुळे फोंड्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलमध्ये शिकताना ‘मिस आल्मेडियन’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

तणाव होता का, याचीही चौकशी

डॉ. अक्षया यांची शवचिकित्सा केली असून मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवला आहे. हा व्हिसेरा तपासणीसाठी वेर्णा येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून त्यानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, अक्षया यांना कोणता ताण होता का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. अक्षया यांचे वृद्ध आई-वडील आणि ती असे तिघेजण फोंड्यात राहात होते. वडील आजारी असल्यामुळे त्यांचा औषधोपचार आणि शिरोडा आरोग्य केंद्रात अधूनमधून करावी लागणारी रात्रपाळी यांमुळे त्यांना ताण आला नसावा ना, अशीही चर्चा सुरू होती.

कवयित्री म्हणूनही ठसा

अक्षया पावसकर या डॉक्टर असल्या, तरी त्या उत्कृष्ट कवयित्रीदेखील होत्या. त्यांच्या कविता टिप्टन पोएट्री जर्नल, शार्डस द ब्लू निब, नॉर्थ ऑफ ऑक्सफर्ड, इंडियन रुमिनेशन, रॉक ॲण्ड स्लिंग आणि इतर ठिकाणी प्रकाशित झाल्या आहेत.

त्यांनी २०२० साली क्रेव्हन आर्टस कौन्सिलची कविता स्पर्धा जिंकली आणि २०१८ मध्ये ‘द ब्लू निब चॅपबुक’ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांची ‘द फॉलिंग इन आणि द फॉलिंग आऊट’ (एलियन बुद्ध प्रेस, २०२१) आणि ‘कॉकटेल ऑफ लाईफ’ (बुकलीफ प्रकाशन, २०२२). ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

...अन् पत्रकारांनाही बसला धक्का

कोरोना काळात शिरोड्याचे सरकारी इस्पितळ कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले होते. तेथील सर्व रुग्णांची काळजी डॉ. अक्षया याच घ्यायच्या आणि पत्रकारांना वेळोवेळी माहिती द्यायच्या.

शिरोडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले; पण कोण डॉक्टर हे माहीत नसल्याने ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधींनी चौकशी करण्यासाठी सकाळी पाचवेळा डॉ. अक्षया यांच्या मोबाईलवर फोन केला.

एरवी लगेच फोन उचलणाऱ्या डॉ. अक्षया फोन का उचलत नाहीत म्हणून त्यांचे नातलग परिमल सावंत यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा डॉ. अक्षया यांचेच निधन झाल्याचे समजल्याने सर्वांनाच धक्का बसला.

व्हिसेरा अहवालाअंती उलगडा शक्‍य

डॉ. अक्षया यांच्‍या मृत्‍यूपश्‍‍चात डॉ. शेर्लीन गोम्‍स यांच्‍या अधिपत्‍याखाली उत्तरीय तपासणी केली; परंतु मृत्‍यू कशामुळे झाला, याचा उलगडा होऊ शकला नाही.

व्‍हिसेरा राखून ठेवला असून, चिकित्‍सा हो‍णार आहे. विषप्रयोग वा अन्‍य काही प्रकार नाही ना, याचा खुलासा त्‍या अहवालातून होईल.

पोस्‍ट कोविडनंतर तरुणांचे एकाएकी मृत्‍यू होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. हा त्‍यातीलच प्रकार नाही ना, अशीही चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT