"गेट अप मिस्टर पीएम!" ट्रम्प यांचा हुकूम मिळताच शाहबाज शरीफ यांनी झुकवलं डोक; पाकिस्तानी पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल

Donald Trump Orders Shehbaz Sharif: डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यातील एका विचित्र प्रसंगामुळे जागतिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Donald Trump Orders Shehbaz Sharif
Donald Trump Orders Shehbaz SharifDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump Orders Shehbaz Sharif To Stand Up: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यातील एका विचित्र प्रसंगामुळे जागतिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. 'बोर्ड ऑफ पीस'च्या पहिल्या बैठकीत ट्रम्प यांनी स्वतःची स्तुती करत भर सभेत शाहबाज शरीफ यांना उभे राहण्याचा आदेश दिला.

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव रोखल्याचे श्रेय घेत ट्रम्प यांनी शरीफ यांच्याकडे पाहून म्हटले की, "पाकिस्तान आणि भारत, हा मोठा विषय होता. मला वाटतं तुम्ही (शरीफ) उभं राहायला हवं. या, जरा उभे राहा." ट्रम्प यांच्या या अनपेक्षित आदेशानंतर शरीफ यांना सर्वांसमोर उभे राहावे लागले, ज्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची एका प्रकारे नाचक्की झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

ट्रम्प यांनी असा दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी दोन्ही देशांना स्पष्ट इशारा दिला होता की, जर हा तणाव निवळला नाही तर ते दोन्ही देशांवर कडक 'टॅरिफ' लावतील.

ट्रम्प म्हणाले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगल्या प्रकारे ओळखतो. मी दोघांनाही फोन करुन सांगितले होते की, जर हा वाद मिटला नाही तर मी तुमच्याशी कोणताही व्यापार करार करणार नाही. त्यानंतर अचानक दोन्ही देश समझोत्यावर पोहोचले." ट्रम्प यांच्या या विधानाला शाहबाज शरीफ यांनीही दुजोरा दिला असून ट्रम्प यांनी युद्धविराम घडवून आणून सुमारे 2.5 कोटी लोकांचे प्राण वाचवले, असे शरीफ यांनी मान्य केले.

शाहबाज शरीफ यांनी या बैठकीत ट्रम्प यांचे आभार मानताना सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी परिस्थिती अत्यंत संवेदनशील झाली होती आणि दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. मात्र, भारताने ट्रम्प यांचा हा मध्यस्थीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

भारताच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात झालेला सैन्य संघर्ष हा कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपामुळे नाही, तर दोन्ही देशांच्या सैन्याच्या 'डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स' (DGMO) मधील थेट चर्चेमुळे थांबला होता. भारताने 7 मे रोजी दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केले होते, जे 'ऑपरेशन पहलगाम'मधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले होते. भारत आपल्या द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची ढवळाढवळ स्वीकारत नसल्याचे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

US Sanctions On International Criminal Court
Susan Dell White House Appearance With Donald Trump
Donald Trump Statement on France Protest
Donald Trump Claims Iran Behind Plane Attack
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com