IND vs PAK: "भारत-पाक शत्रुत्व म्हणजे निव्वळ नाटक!" ॲलिस्टर कुकचा खळबळजनक दावा; क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

Alastair Cook On India vs Pakistan Controversy: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यानंतर आता एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे.
Alastair Cook On India vs Pakistan Controversy:
alastair cookDainik Gomantak
Published on
Updated on

Alastair Cook On India vs Pakistan Controversy: टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यानंतर आता एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. मैदानावर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात न मिळवल्याने चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असतानाच इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक याने एक मोठा गौप्यस्फोट केला. कुकच्या मते, मैदानावर दिसणारा हा दुरावा केवळ एक 'दिखावा' असून बंद खोलीत खेळाडूंचे संबंध अतिशय खेळीमेळीचे आहेत.

ॲलिस्टर कुकचा खुलासा

'स्टिक टू क्रिकेट' या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये बोलताना कुकने भारत-पाकिस्तान (Pakistan) वादावर सडेतोड भाष्य केले. कुक म्हणाला, "मैदानावर हात न मिळवणे हे केवळ जगाला दाखवण्यासाठी आहे. प्रत्यक्षात खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये किंवा हॉटेलमध्ये एकमेकांशी गप्पा मारतात, हसतात. मी वाचले आहे की, पडद्यामागे सर्वकाही सुरळीत सुरु आहे. मग केवळ मैदानावरच असा अलिप्तपणा का? हे सर्व निव्वळ एक नाटक वाटते." कुकच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Alastair Cook On India vs Pakistan Controversy:
IND vs PAK: "पाकिस्तान टीम मी माझीच मानतो, पराभवामुळे मला...", पाकड्यांच्या पराभवाचं भारताच्या माजी न्यायमूर्तींना दु:ख

मायकल वॉनने व्यक्त केली खंत

कुकच्या या दाव्यावर बोलताना इंग्लंडचाच माजी कर्णधार मायकल वॉन याने मात्र नाराजी व्यक्त केली. "क्रिकेटसारखा खेळ, जो खिलाडूवृत्तीसाठी ओळखला जातो, तिथे दोन संघांनी एकमेकांशी हस्तांदोलन न करणे हे अत्यंत क्लेशदायक आहे," असे वॉनने म्हटले. मात्र, कुकने ही बाब हलक्यात घेत खेळाडूंमध्ये कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Alastair Cook On India vs Pakistan Controversy:
IND vs PAK: ईशान किशन ठरला 'हिरो', गोलंदाजांनी मोडलं पाकड्यांचं कंबरडं; हायहोल्टेज सामन्यात भारताचा 61 धावांनी दणदणीत विजय

काय आहे 'नो-हॅंडशेक' पॉलिसी?

भारत (India) आणि पाकिस्तानमधील वाढत्या राजकीय तणावामुळे 2025 च्या दुबईतील आशिया चषकापासून या पॉलिसीची सुरुवात झाली होती. भारतीय खेळाडूंना सुरक्षेच्या आणि धोरणात्मक कारणास्तव पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आशिया चषक 2025 मध्ये तीनदा आमनेसामने येऊनही खेळाडूंनी हात मिळवणी केली नाही. हेच लोण आता महिला क्रिकेट आणि अंडर-19 पर्यंत पोहोचले असून टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्येही सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधाराने टॉसच्या वेळी हात मिळवणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com