Vedanta Bicholim Mine Block: डिचोलीतील खाण जनसुनावणीचे भवितव्‍य आता दिल्‍लीत ठरणार!

आक्षेपांचा होणार अभ्‍यास : वन मंत्रालय घेणार पर्यावरण दाखल्‍याचा निर्णय
Mine Block Goa
Mine Block Goa Dainik Gomantak

Bicholim Vedanta Mine Block डिचोली तालुक्यातील डिचोली, बोर्डे, लामगाव, मुळगाव, मये आणि शिरगाव येथील खाणींना पर्यावरण दाखला देण्यासाठी पुन्हा जनसुनावणी घ्यायची की, 11 ऑगस्ट रोजी झालेली जनसुनावणी वैध मानून पर्यावरण दाखला जारी करायचा, याचा निर्णय दिल्लीतील वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय घेणार आहे.

या मंत्रालयाने नेमलेली तांत्रिक समिती ही जनसुनावणीत मांडलेले मुद्दे आणि त्यावरील आक्षेपांना कंपनीने दिलेले उत्तर पडताळून याविषयी निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोली येथे झालेल्या जनसुनावणीवेळी लोकांनी मांडलेल्या मुद्यावर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने इतिवृत्त तयार केले आहे. पुढील आठवड्यात ते दिल्लीला पाठवले जाणार आहे.

डिचोली खाणपट्टा क्रमांक १ या नावाने ही खाण ओळखली जाणार आहे. ४७८.५२०६ हेक्टर क्षेत्रात खाणकाम करण्यासाठी पर्यावरण दाखला मिळावा, यासाठी मे. वेदांता लिमिटेड कंपनीने वरून अर्ज केला आहे.

तीन दशलक्ष टन खनिज या खाणीतून काढले जाणार आहे. त्यासाठीचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल कंपनीने तयार करून घेतला आहे. त्यावर आधारित ही सुनावणी झाली आहे. फेर जनसुनावणी घ्यावी, अशी जोरदार मागणी त्यावेळी करण्यात आली होती.

गोवा फाऊंडेशननेही तसा अर्ज प्रशासनाला सादर केला आहे. त्यामुळे यासंदर्भात संबंधितांशी संपर्क साधला असता, याचा निर्णय दिल्लीतच होईल, असे सांगण्यात आले.

मानसवाडा-मुळगाव शाळेची नोंद अहवालात करून त्यापासून योग्य अंतर राखण्यात येईल, असेही कंपनीने विनोद मांद्रेकर यांच्या प्रश्नानंतर स्पष्ट केले आहे.

Mine Block Goa
Goa Crime: बलात्कार प्रकरणी 'वाँटेड' हलीमला मडगाव येथे अटक

डिचोलीत खाणकामाला विरोध, असे चित्र असले तरी अनेकांनी जनसुनावणीवेळी खाणकामाला पाठिंबा दिला होता. काहींनी कंपनीने सामाजिक कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत अप्रत्यक्षपणे खाणकामाला पाठिंबा दिला आहे.

इतिवृत्तात त्यांची नावे नोंदवली आहेत. त्यात सिद्धेश परब, प्रशांत धारगळकर, प्रतिभा धारगळकर, श्रीकांत धारगळकर, संजय परब, शैलेश नावेलकर, संजय मांद्रेकर, कमलेश तेली, आनंद नाईक, शैलेश गावकर, मिलींद बर्वे, सदाशिव फाळकर, फ्रांको सिक्वेरा, सुदन गोवेकर, शैलेंद्र नाटेकर, दिनेश दिवेकर, मान्युएल फर्नांडिस, प्रशांत शिरोडकर, प्रकाश पोपकर, गणपत परब, नीलेश गोसावी, तुषार फळारी, चंद्रशेखऱ पाळणी, ऋत्विक मांद्रेकर, राजेश वायंगणकर व इतरांचा समावेश आहे.

Mine Block Goa
Ponda Accident: केरयान खांडेपार येथे प्रवासी बसला अपघात, तिघे प्रवासी किरकोळ जखमी

...यांचा खाणीला विरोध

काहींनी या खाणकामाला विरोधही केला आहे. त्याचीही दखल इतिवृत्तात घेण्यात आली आहे. त्यात दीपक पोपकर, नीलेश दाभोलकर, भीमाकर पळ, नरेश नाईक, कुस्तुलो पळ, प्रदीप रेवोडकर, निखिल नाईक, प्रेमनाथ होबळे, वसंत गाड, गजानन गावकर, रामकृष्ण कुंडईकर, सत्यवान चोडणकर, गजानन मांद्रेकर, मधुकर हळर्णकर गोपाळ परब, कृष्णा गडेकर व इतरांचा समावेश आहे. अजय प्रभुगावकर यांनी अहवाल रद्द करून जनसुनावणी पुन्‍हा घ्‍या, असे म्‍हटले आहे.

Mine Block Goa
Goa Accident Case: बिंबल बंधारा ठिकाणी अज्ञात मृतदेह सापडला

...हे जनसुनावणीस अनुपस्थित

जनसुनावणीवेळी मुद्दे मांडणार, असे सांगून अनुपस्थित असलेल्यांची नावेही इतिवृत्तात नोंद आहेत. त्यात संदीप गावकर, गणेश गोवेकर, भाऊ गाड, विठ्ठल परब, देविदास गोवेकर, संजय गावकर, पांडू कुंडईकर, संदेश पाळणी, नितेश परब गावकर, प्रजल गावकर, राजेश परब, संदीप सिनारी व इतरांचा समावेश आहे.

इतिवृत्तात म्हटले आहे...

खाण हा महत्त्वाचा उद्योग असल्याने शक्य तितक्या लवकर खाणकाम सुरू करावे, अशी निवेदने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्राप्त झाली आहेत. या निवेदनांमध्‍ये असेही म्हटले आहे की, खाणकाम सुरू होण्याचा चांगला प्रभाव सभोवतालच्या गावांवर तसेच राज्यावर पडेल.

कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून केल्या जाणाऱ्या कामांचा फायदा जनतेला होईल. त्यातून त्यांना रोजीरोटी कमावता येईल. या जनसुनावणीवेळी १८७ जणांनी म्हणणे मांडल्याची नोंद केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com