Lairai Jatra Stampede Dainik Gomantak
गोवा

Goa Stampede: '..अजूनही धोंड भक्तगणांचा आरडाओरडा ऐकू येत आहे'! लईराई दुर्घटनेतील प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

Lairai Jatra Stampede: कानात अजूनही धोंड भक्तगणांचा आरडाओरडा गुंजत आहे, असे अनुभव म्हावळंगतड-साखळी येथील श्री टोणयेश्‍‍वर मंदिराच्या मंडपात सोवळे व्रत पाळणाऱ्या धोंडगणांनी बोलताना सांगितला.

Sameer Panditrao

साखळी: श्री लईराई देवीच्‍या नावाचा जयघोष करून दरवर्षी जत्रोत्सवात सहभागी झाल्यानंतर सोवळे व्रत व अग्निदिव्य मार्गक्रमण केल्याचे मोठे समाधान लाभते. श्रद्धा भावनेने देवीची केलेली सेवा तसेच जत्रोत्सवातील अनेक स्मृती स्मरणात ठेवून आम्ही घरी परततो. परंतु यावर्षी आलेला कटू अनुभव आम्ही कधीच विसरू शकणार नाही.

आज दोन दिवस झाले तरी डोळ्यांसमोरून ते चित्र जात नाही. कानात अजूनही धोंड भक्तगणांचा आरडाओरडा गुंजत आहे, असे अनुभव म्हावळंगतड-साखळी येथील श्री टोणयेश्‍‍वर मंदिराच्या मंडपात सोवळे व्रत पाळणाऱ्या धोंडगणांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला.

शक्तीन सुरेश नाईक, तुषार नाईक, प्रियेश नाईक, शुभम आमशेकर, शुभम घाडी, मापारी, प्रणव सालेलकर व इतर या धोंडगणांनी हा थरारक अनुभव सांगितला. दरवर्षी या जत्रोत्सवात सहभागी झाल्यानंतर आम्ही गटानेच अग्निदिव्य करण्‍यासाठी जातो.

Goa Stampede

काल प्रसंग घडलेल्या उतरणीच्या ठिकाणी दरवर्षी गोंधळ होतोच. यावर्षी मात्र कल्‍पना न करण्‍याएवढा तो महागात पडला. या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या तसेच जखमी गंभीर व झालेल्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना वेदनादायक स्थितीला सामोरे जावे लागलेच, परंतु ही घटना प्रत्यक्षात पाहिलेल्या आमच्यासारख्या धोंडगणांची स्थितीही तशीच नाही, असे त्‍यांनी सांगितले.

प्रथमच जत्रोत्सवात अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आमच्या डोळ्यासमोर घडला. मोठ्या प्रमाणात झालेली चेंगराचेंगरी, उडालेला गोंधळ, सर्वांची झालेली धावपळ, महिला-पुरुष धोंडगणांचा आरडाओरडा, त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेले धोंडगण यामुळे मनात एकच भीती भरली. ही भीती या लोकांना मदतीसाठी हातसुद्धा घालू देत नव्हती. तरीही आम्ही आमच्या परीने मनाला समजावत धाडस केलेच आणि काही प्रमाणात मदतीचा हातही दिला.

आमच्यातील काही धोंडगणांनी तर हे दृश्य पाहण्यापेक्षा बाजूला उभे राहणे पसंत केले. कारण स्थितीच अशी भयानक होती की चांगल्या स्थिर असलेल्‍या व्यक्तीलाही बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या धोंडगणांना पाहून भोवळ यायची, असे या सांगताना या धोंडगणांच्‍या अंगावर शहारे आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT