Shirgao Lairai Jatra Dainik Gomantak
गोवा

Shirgao Lairai Jatra: 'लईराई' जत्रोत्सवासाठी साखळी बाजारपेठ फुलली, रेडिमेड सोवळ्यांबरोबर भाजीपाला, फळांचीही आवक

Lairai Jatra: डिचोली तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार, २१ रोजी होणाऱ्या श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवानिमित्त साखळीच्या बाजारात धोंडगणांना आवश्यक सर्व साहित्य दाखल झालेले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी: डिचोली तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार, २१ रोजी होणाऱ्या श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवानिमित्त साखळीच्या बाजारात धोंडगणांना आवश्यक सर्व साहित्य दाखल झालेले आहे. या साहित्याने सध्या बाजारपेठ फुलल्याचे दिसून येत आहे. बाजारात व बाजाराबाहेरही जत्रोत्सवात आवश्यक सर्व साहित्य मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी उपलब्ध केले आहे. धोंडगणांकडूनही या साहित्याच्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत आहे.

या जत्रोत्सवात सहभागी होणाऱ्या धोंडगणांना आपले सर्व साहित्य नवीन घ्यावे लागते. हे सर्व साहित्य आपल्या तळावर गेल्यानंतर सर्वप्रथम पाण्याने भिजवावे लागते व स्वतः स्नान करून नंतरच तळावरील कामांमध्ये सहभागी होण्याचा नियम व शास्त्र सर्व धोंडगण काटेकोरपणे पाळतात. त्यासाठी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कपडे, चपले, रेडिमेड सोवळी व इतर साहित्य उपलब्ध झाले आहे.

या साहित्याबरोबरच प्रत्येक तळावर पाच दिवस व तीन दिवस धोंडगणांसाठी जेवण तयार केले जाते. या भोजनासाठी आवश्यक असलेले सर्व कडधान्य, भाजीपाला व इतर संबंधित साहित्याचीही बरीच आवक वाढविण्यात आलेली आहे. तसेच बाजारात कलिंगडे, केळी व इतर फळेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहे.

या सोवळ्या व्रतावेळी प्रत्येक धोंडगणांच्या तळांवर धोंडगणांसह स्थानिक लोकही जेवायला येतात. त्यांच्यासाठीही दररोज जेवण तयार केले जाते. त्यामुळे मुबलक साहित्य प्रत्येक तळावरील धोंडगण खरेदी करतात.

मोठी आर्थिक उलाढाल!

शिरगावच्या जत्रोत्सवात धोंडगणांना लागणारे सर्व साहित्य, तसेच शिरगावातील लोकांना लागणाऱ्या घरगुती साहित्याची बाजारात या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असते. दरवर्षी या जत्रोत्सवाच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल सर्वत्र पाहायला मिळते. या जत्रोत्सवाची सर्वच व्यापारी आतुरतेने वाट पाहत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT