

Zodiac Signs Bad Luck Shul Yoga: ज्योतिष शास्त्रामध्ये काही योग अत्यंत शुभ मानले जातात, तर काही योग मानवी जीवनावर नकारात्मक आणि अशुभ प्रभाव पाडणारे ठरतात. असाच एक अशुभ मानला जाणारा 'शूल योग' 14 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी निर्माण होणार आहे. हा योग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजून 56 मिनिटांनी समाप्त होईल.
हा योग जरी 15 जूनच्या सकाळी संपणार असला, तरी त्याचा अशुभ आणि नकारात्मक प्रभाव पुढील काही दिवसांपर्यंत विविध राशींवर पाहायला मिळणार आहे. या शूल योगाच्या प्रभावामुळे प्रामुख्याने 5 राशींच्या जातकांच्या आयुष्यात अनेक अडचणी आणि समस्यांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 राशी आणि त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शूल योगाचा काळ त्रासाचा ठरु शकतो. या काळात धावपळ आणि दगदग जास्त झाल्यामुळे तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्य अचानक बिघडू शकते, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक आघाडीवर हा काळ नुकसानीचा संकेत देत असून, तुमचे नको असलेले खर्च वाढतील किंवा पैशांचे नुकसान होईल. याशिवाय तुमच्या लव्ह लाईफमध्ये गैरसमज निर्माण होऊन परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा.
कन्या राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना या काळात अत्यंत सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्ही करत असलेल्या अफाट मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्यामुळे तुम्ही प्रचंड अस्वस्थ आणि त्रस्त राहाल. याच मानसिक तणावातून किंवा घाईगडबडीत तुम्ही कोणती तरी मोठी चूक करुन बसाल, ज्याचा सर्वात मोठा फटका आणि आर्थिक नुकसान तुम्हालाच सहन करावा लागेल. आरोग्याच्या (Health) बाबतीत तुम्हाला पायात तीव्र वेदना किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ संयम राखण्याचा आहे. जे लोक सिंगल आहेत आणि विवाहासाठी स्थळ शोधत आहेत, त्यांनी या काळात नवीन नाते जोडणे किंवा लग्न ठरवणे टाळावे, अन्यथा भविष्यात त्रास होऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात एखाद्या नवीन डील किंवा कराराच्या चक्करमध्ये तुमची खूप जास्त पळापळ आणि धावपळ होईल, परंतु हाती फारसे काही लागणार नाही. या संपूर्ण काळात तुम्हाला पैशांच्या चणचणीचा म्हणजेच आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ कामाच्या ठिकाणी आव्हानात्मक असेल. ऑफिसमध्ये काही सहकारी किंवा विरोधक तुमचे काम बिघडवण्याचा आणि तुमची प्रतिमा मलिन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, म्हणूनच आपल्या कामात कोणतीही निष्काळजीपणा दाखवू नका आणि सतर्क राहा. मालमत्ता किंवा प्रॉपर्टीशी संबंधित कोणताही मोठा व्यवहार या काळात घाईघाईने करु नका, फसवणूक होऊ शकते. कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला तर घरातील वादात कोणतीही सुधारणा पाहायला मिळणार नाही.
कुंभ राशीच्या जातकांसाठी शूल योगाचा प्रभाव मानसिक अशांती वाढवणारा ठरेल. कार्यक्षेत्रात किंवा वैयक्तिक आयुष्यात तुमच्या मनासारख्या गोष्टी न घडल्यामुळे तुम्ही प्रचंड चिडचिड कराल आणि निराश राहाल. याच चिडचिडेपणातून घाईगडबडीत घेतलेला एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो. जर तुमच्या घरात लहान मुले असतील, तर या काळात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण त्यांची तब्येत अचानक बिघडण्याची दाट शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.